लक्ष्य गाठण्यासारखे होते, पण...! हार्दिक पांड्या कुठे चुकलो हे सांगायचं सोडून CSK बाबत...  

पराभवानंतर MI चा कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) महेंद्रसिंग धोनीचे अप्रत्यक्षपणे कौतुक केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 11:44 PM2024-04-14T23:44:58+5:302024-04-14T23:45:33+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi: Definitely, gettable. But they bowled pretty well and Pathirana was the difference.   | लक्ष्य गाठण्यासारखे होते, पण...! हार्दिक पांड्या कुठे चुकलो हे सांगायचं सोडून CSK बाबत...  

लक्ष्य गाठण्यासारखे होते, पण...! हार्दिक पांड्या कुठे चुकलो हे सांगायचं सोडून CSK बाबत...  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. MS Dhoni ने शेवटच्या ४ चेंडूंत केलेल्या २० धावा निर्णायक ठरल्या, कारण CSK च्या २०६ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला २० धावाच कमी पडल्या. या पराभवानंतर MI चा कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) महेंद्रसिंग धोनीचे अप्रत्यक्षपणे कौतुक केले. 

एका हातात पँट अन् दुसऱ्या हाताने चेंडू पकडण्याची धडपड! रोहितसोबत Moye-Moye क्षण


इशान किशन ( २३) आणि रोहित शर्मा यांनी ७ षटकांत ७० धावा जोडल्या. पण, ७व्या षटकात मथिशा पथिराणाने ३ चेंडूंत दोन धक्के ( इशान व सूर्यकुमार यादव) देताना मॅच फिरवली. रोहित शर्मा मैदानावर उभा राहिला आणि त्याला तिलक वर्मा ( ३१) ने साथ देताना ३८ चेंडूंत ६० धावा जोडल्या. पथिराणाने ही जोडी तोडली. शार्दूल ठाकूरने १६व्या षटकात २ धावा आणि १७व्या षटकात तुषार देशपांडेने ३ धावा देत हार्दिक पांड्याची ( २) विकेट मिळवली. या दोन षटकांनी सामना CSK च्या बाजुने झुकला. टीम डेव्हिड ( १३) व रोमारिओ शेफर्ड  (१) स्वस्तात माघारी परतले. २०व्या षटकात रोहितने चौकार खेचून ६१ चेंडूंत शतक पूर्ण केले.  रोहित ६३ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह १०५ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने हा सामना २० धावांनी जिंकला. मुंबईला ६ बाद १८६ धावा करता आल्या.


तत्पूर्वी, MS Dhoni ने शेवटच्या ४ चेंडूंत ६,६,६,२ अशी फटकेबाजी करून २० धावा कुटल्या व CSK ला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. त्याआधी कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावा कुटल्या. त्याने तिसऱ्या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. दुबे ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.  

हार्दिक पांड्या काय म्हणाला?
निश्चितपणे, हे लक्ष्य गाठण्यासारखे होते. पण CSK ने चांगली गोलंदाजी केली आणि पाथिराणाने सामना फिरवला. ते त्यांच्या योजना चतुराईने अमलात आणल्या आणि  लांब सीमांचा चांगल्या प्रकारे वापर केला. स्टम्पच्या मागे एक माणूस उभा आहे, जो त्यांना योग्य डावपेच शिकवणार, हे त्यांना माहित्येय. चेंडू किंचित ग्रिप पकडत होता आणि त्यांनी सामन्यावर पकड घेतली होती. पथिराणा गोलंदाजीला येईपर्यंत सामना आमच्या हातात होता.  
 

 

Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi: Definitely, gettable. But they bowled pretty well and Pathirana was the difference.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.