IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : ऋतुराज गायकवाड व शिवम दुबे यांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात अपेक्षित झाली नसली तरी वन डाऊन आलेल्या ऋतुराजने सलामीवीर रचीन रविंद्रसह डावाला आकार दिला आणि त्यानंतर शिवम दुबेसह प्रहार केला. ही जोडी तोडण्यासाठी MI चे खेळाडू सर्वस्व पणाला लावत होते. अशाच एका प्रयत्नात रोहित शर्मा ( Rohit Sharma) Moye Moye क्षणाचा शिकार झाला.
इशान किशनने DRS घे सांगितले, तेव्हा हार्दिक पांड्याने निर्णय घेतला अन् CSK ला धक्का बसला
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. CSK ने आज अजिंक्य रहाणेला सलामीला पाठवले, परंतु तो ८ धावाच करू शकला. गेराल्ड कोएत्झीने त्याची विकेट मिळवली. कर्णधार ऋतुराज गायकवाड व रचीन रवींद्र यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. श्रेयस गोपाळच्या चेंडूवर रचीन ( २१) झेलबाद झाला. मैदानावरील अम्पायरने नाबाद निर्णय दिला होता, परंतु इशान किशनने DRS घेण्यासाठी हार्दिकला मनवले आणि तो निर्णय योग्य ठरला. ऋतुराव व शिवम दुबे यांनी तुफान फटकेबाजी केली. फॉर्मात असलेल्या ऋतुराजचा झेल टिपण्यासाठी रोहित शर्माने उत्तम डाईव्ह मारली, परंतु तो प्रयत्न करूनही झेल पकडू शकला नाही.
पण, या प्रयत्नात रोहितची पँट सरकली अन् एका हातात त्याला पँट सावरायला लागली, तर दुसऱ्या हाताने चेंडू पकडावा लागला. या मोये मोये क्षणानंतर रोहितने पँटची नाडी बांधली. मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलून ऋतुराजने ३३ चेडूंत अर्धशतक पूर्ण केले.