MS Dhoni, एक ही दिल कितनी बार जीतोगे? ५ रेकॉर्ड नोंदवले अन् चाहतीला दिले स्पेशल गिफ्ट

चेन्नई सुपर किंग्सकडून ५००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो दुसरा खेळाडू ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 10:20 PM2024-04-14T22:20:34+5:302024-04-14T22:21:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : MS Dhoni giving the Match Ball to Young Girl at Wankhede, CSK batter registered 5 big record , Video | MS Dhoni, एक ही दिल कितनी बार जीतोगे? ५ रेकॉर्ड नोंदवले अन् चाहतीला दिले स्पेशल गिफ्ट

MS Dhoni, एक ही दिल कितनी बार जीतोगे? ५ रेकॉर्ड नोंदवले अन् चाहतीला दिले स्पेशल गिफ्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : MS Dhoni ने  मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शेवटच्या ४ चेंडूवर ५००च्या स्ट्राईक रेटने फटके खेचले. We want Dhoni... असा नारा घुमत असताना डॅरिल मिचेल २०व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला अन् वानखेडेवर माही नामाचा नाद दुमदुमला... त्याने चाहत्यांना निराश नाही केले आणि ६,६,६,२ अशी फटकेबाजी मारून ५ मोठे विक्रम नोंदवले. त्यानंतर त्याने एका चिमुरडीचे मनही जिंकले.

कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावा कुटल्या. त्याने तिसऱ्या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. दुबे ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. शेवटच्या ४ चेंडूंसाठी धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून गेले. धोनीने पहिलाच चेंडू मिड ऑनच्या दिशेने सीमापार पाठवला. त्यानंतर पुढील दोन चेंडू षटकार खेचले व शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेऊन धोनीने ४ चेंडूंत २० धावा चोपल्या व CSK ला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. 

  • चेन्नई सुपर किंग्सकडून ५००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो दुसरा खेळाडू ठरला. सुरेश रैनाने ५५२९ सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि त्यानंतर धोनीचा ( ५०१६) क्रमांक येतो. या विक्रमात फॅफ ड्यू प्लेसिस ( २९३२), माईक हसी ( २२१३), मुरली विजय ( २२०५) व ऋतुराज गायकवाड ( २०२१) असा क्रम येतो.  

 

  • ४० वर्ष पूर्ण केल्यानंतर धोनीने आयपीएलमध्ये २०व्या षटकात २५६.२५च्या स्ट्राईक रेटने १६४ धावा केल्या आहेत. अन्य कोणत्याही फलंदाजाला त्यानंतर आयपीएलच्या २०व्या षटकात ६० पेक्षा जास्त किंवा २५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा करता आलेल्या नाहीत. या १६४ धावांत धोनीने सर्वाधिक १५ षटकार खेचले आहेत
  • ४० हून अधिक वयाच्या खेळाडूने ट्वेंटी-२० फ्रँचायझी लीगमध्ये ( किमान २ चेंडू) ५००च्या स्ट्राईक रेटने धावा चोपण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी धोनीने २०२३ मध्ये LSG विरुद्ध ३ चेंडूंत १२ धाव चोपलेल्या.  
  • वानखेडे स्टेडियमवर CSK ची ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. २०२१ मध्ये त्यांनी KKR विरुद्ध ३ बाद २२० धावा चोपलेल्या.  
  • आयपीएलमध्ये किमान ४ चेंडूंच सामना करून ५००चा स्ट्राईक रेटने धावा करून महेंद्रसिंग धोनीने मोठा पराक्रम केला. कृणाल पांड्याने २०२० मध्ये SRH विरुद्ध अशी फटकेबाजी केली होती. 

 

सामन्यानंतर पेव्हेलियनच्या दिशेने जात असताना पायऱ्यांवर चेंडू पडला होता आणि प्रेक्षकांमघील मुलीने तो धोनीला देण्यास सांगितला. धोनीने ही विनंती मान्य केली व तिला चेंडू दिला.  




Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : MS Dhoni giving the Match Ball to Young Girl at Wankhede, CSK batter registered 5 big record , Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.