IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : MS Dhoni ने तमाम भारतीयांना २०११च्या वर्ल्ड कप फायनलच्या त्या आठवणीत नेले... मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शेवटच्या ४ चेंडूवर महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने हार्दिक पांड्याची पार वाट लावली. सामन्यापूर्वी माहीला मिठी मारणाऱ्या हार्दिकची २०व्या षटकात केविलवाणी अवस्था केली. पहिल्या चेंडूवर धोनीने खणखणीत षटकार खेचला आणि स्टेडियम दणाणून गेले. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि नेहा धुपिया यांची रिॲक्शन पाहण्यासारखी होती. त्यात सलग दुसरा षटकार खेचल्यावर सारा तेंडुलकरही ( Sara Tendulkar) थक्क झालेली दिसली...
कर्णधार ऋतुराज गायकवाड व रचीन रवींद्र (२१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. ऋतुराजने ४० चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. या विकेटनंतर महेंद्रसिंग धोनीची प्रतीक्षा चाहते करत होते, परंतु डॅरिल मिचेल आला. हा निर्णय चाहत्यांना फार आवडला नाही. मिचेल १४ चेंडूंत १७ धावांवर झेलबाद झाला आणि शेवटच्या ४ चेंडूंसाठी धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून गेले.
धोनीने पहिलाच चेंडू मिड ऑनच्या दिशेने सीमापार पाठवला अन् नेहा धुपिया चकित झाली. त्यानंतर पुढील दोन चेंडू षटकार खेचले व शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेऊन धोनीने ४ चेंडूंत २० धावा चोपल्या व CSK ला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. दुबे ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.