IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून गेले. अजिंक्य रहाणेला CSK ने सलामीला पाठवले होते, परंतु तो अपयशी ठरला. ऋतुराजने मागील सामन्यातील आपला फॉर्म कायम राखताना वन डाऊन येऊन तुफान फटकेबाजी केली. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावताना मोठा विक्रम नावावर केला.
एका हातात पँट अन् दुसऱ्या हाताने चेंडू पकडण्याची धडपड! रोहितसोबत Moye-Moye क्षण, Video
अजिंक्य रहाणेला ( ८) सलामीला पाठवण्याची रणनीती फेल गेली. पण, कर्णधार ऋतुराज गायकवाड व रचीन रवींद्र (२१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. श्रेयस गोपाळने ही जोडी तोडल्यानंतर लोकल बॉय शिवम दुबेने तुफान फटकेबाजी केली. फॉर्मात असलेल्या ऋतुराजचा झेल टिपण्यासाठी रोहित शर्माने उत्तम डाईव्ह मारली, परंतु तो प्रयत्न करूनही झेल पकडू शकला नाही. मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलून ऋतुराजने ३३ चेडूंत अर्धशतक पूर्ण केले.
पाठोपाठ दुबेनेही २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी चौकार-षटकारांचा सपाटा लावला होता आणि हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज ६९ ( ४० चेंडूं, ५ चौकार व ५ षटकार) धावांवर झेलबाद झाला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये २००० धावा पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम ऋतुराजने नावावर केला. त्याने ५७ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडून लोकेश राहुल ( ६०), सचिन तेंडुलक ( ६३), रिषभ पंत ( ६४) व गौतम गंभीर ( ६८) यांना मागे टाकले.
Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : RUTURAJ GAIKWAD ( 69) BECOMES THE FASTEST INDIAN IN IPL HISTORY TO SCORE 2,000 RUNS, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.