IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे यजमान मुंबई इंडियन्सचे कमी, तर चेन्नई सुपर किंग्सचे घरचे मैदान वाटत होते. MS Dhoni चा शेवटचा आयपीएल असा अंदाज बांधून त्याचे चाहते वानखेडेवर उपस्थित होते. पण, ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) आणि लोकल बॉय शिबम दुबे ( Shivam Dube) यांनी केलेल्या फटकेबाजीने मैदान गाजवले. MI च्या गोलंदाजीतील कमकुवतपणा आजही स्पष्ट दिसला. MS Dhoni ने २०व्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सलग ३षटकार खेचले.
१० चेंडूंत चोपल्या ५० धावा! ऋतुराज गायकवाडने कसला हाणला, IPL मध्ये इतिहास घडविला
अजिंक्य रहाणेला ( ८) सलामीला पाठवण्याची CSK ची रणनीती फेल गेली. पण, कर्णधार ऋतुराज गायकवाड व रचीन रवींद्र (२१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी करून डाव सावरला. लोकल बॉय शिवम दुबेने आज मुंबई इंडियन्सच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. ऋतुराजने ३३ चेडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ दुबेनेही २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी चौकार-षटकारांचा सपाटा लावला होता आणि हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज ६९ ( ४० चेंडूं, ५ चौकार व ५ षटकार) धावांवर झेलबाद झाला. त्याने तिसऱ्या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली.
आयपीएलमध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये २००० धावा पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम ऋतुराजने नावावर केला. त्याने ५७ इनिंग्जमध्ये हा टप्पा ओलांडून लोकेश राहुल ( ६०), सचिन तेंडुलक ( ६३), रिषभ पंत ( ६४) व गौतम गंभीर ( ६८) यांना मागे टाकले. पण, दुबे ऐकणारा नव्हता आणि त्याने रोमारियो शेफर्डच्या चौकार-षटकारांची आतषबाजी केली. MS Dhoni च्या आधी डॅरिल मिचेलला पाठवण्याचा निर्णय चाहत्यांना फार आवडला नाही. मिचेल १४ चेंडूंत १७ धावांवर झेलबाद झाला आणि शेवटच्या ४ चेंडूंसाठी धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून गेले. धोनीने पहिलाच चेंडू मिड ऑनच्या दिशेने सीमापार पाठवला अन् नेहा धुपिया चकित झाली. त्यानंतर पुढील दोन चेंडू षटकार खेचले व शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेऊन धोनीने ४ चेंडूंत २० धावा चोपल्या व CSK ला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. दुबे ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.