इशान किशनने DRS घे सांगितले, तेव्हा हार्दिक पांड्याने निर्णय घेतला अन् CSK ला धक्का बसला

अजिंक्य रहाणेची विकेट पडल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 08:26 PM2024-04-14T20:26:08+5:302024-04-14T20:26:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : What a fabulous use of DRS by Mumbai Indians, Credit to Ishan Kishan, single handedly convincing his captain Hardik Pandya that there is an edge, Rachin Ravindra departs for 21,Video | इशान किशनने DRS घे सांगितले, तेव्हा हार्दिक पांड्याने निर्णय घेतला अन् CSK ला धक्का बसला

इशान किशनने DRS घे सांगितले, तेव्हा हार्दिक पांड्याने निर्णय घेतला अन् CSK ला धक्का बसला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आवाजाचा सर्वाधिक १३१ डेसीबलचा रेकॉर्ड मोडला गेला. अजिंक्य रहाणेची विकेट पडल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडले. पण, त्यांना चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांकडून तितक्याच जोरदार आवाजात प्रत्युत्तर मिळाले. पण, याही सामन्यात हार्दिक पांड्याला ट्रोल करण्याची संधी चाहत्यांनी गमावली नाही. रोहित शर्मा गोलंदाजांशी चर्चा करताना दिसल्याने चाहते आनंदात होते, कारण आजही त्यांच्यासाठी MI चा कर्णधार तोच आहे. त्यात इशान किशनच्या सांगण्यावरून हार्दिकने DRS घेतला अन् तो यशस्वी ठरला. 


आयपीएल इतिहासात प्रथमच CSK vs MI सामन्यात ना धोनी कर्णधार आहे, ना रोहित... हार्दिक पांड्या व  ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली MI व CSK ने या पर्वाची नवी सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दव फॅक्टर महत्त्वाचा असल्याने हा निर्णय घेतल्याचे हार्दिक पांड्याने सांगितले. मुंबईच्या ताफ्यात आज कोणताही बदल नाही, परंतु चेन्नईने मथिशा पथिराणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेताना महिशा तिक्षणाला विश्रांती दिली. दरम्यान, MS Dhoni चा हा CSK कडून २५० वा सामना आहे आणि एकाच फ्रँचायझीकडून इतके सामने खेळणारा तो विराट कोहली ( २५८ , RCB) दुसरा खेळाडू ठरला.  


CSK ने आज अचंबित करणारा डाव टाकला आणि लोकल बॉय अजिंक्य रहाणे याला त्यांनी रचिन रवींद्रसोबत सलामीला पाठवले. मोहम्मद नबीच्या पहिल्याच षटकात रहाणेने चौकार खेचला खरा, परंतु दुसऱ्या षटकात गेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर पुल शॉटवर तो झेलबाद झाला. CSK ला ८ धावांवर पहिला धक्का बसला. पण, ऋतुराजने धावांचा वेग वाढवला अन् सोबतीला रवींद्र उभा होताच. श्रेयस गोपाळला तुक्का लागला आणि रवींद्रची ( २१) विकेट त्याला मिळाली. रवींद्र व ऋतुराज यांनी ५२ धावांची भागीदारी केली. मैदानावरील अम्पायरने नाबाद निर्णय दिला होता, परंतु इशान किशनने DRS घेण्यासाठी हार्दिकला मनवले आणि तो निर्णय योग्य ठरला. Image 

Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Marathi : What a fabulous use of DRS by Mumbai Indians, Credit to Ishan Kishan, single handedly convincing his captain Hardik Pandya that there is an edge, Rachin Ravindra departs for 21,Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.