IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : रोमारियो शेफर्ड ( ROMARIO SHEPHERD) नावाचे कॅरेबियन वादळ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर घोंगावले. रोहित शर्मा व इशान किशन यांच्या विकेटनंतर मुंबई इंडियन्सच्या धावगतीला ब्रेक लागला होता. पण, हार्दिक पांड्या व टीम डेव्हिड यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना जमिनीवर आणले आणि रोमारियोने १० चेंडूंत त्यांना पार आपटले... २०व्या षटकात रोमारियोने ३२ धावा चोपल्या आणि यंदाच्या आयपीएलमधील हे सर्वात महागडे षटक ठरले.
रोहित शर्मा ( ४९) व इशान किशन ( ४२) या दोघांना अक्षर पटलेने बाद केले. अक्षरने स्वतःच्याच गोलंदाजीवर इशानचा घेतलेला रिटर्न कॅच या पर्वातील सर्वोत्तम कॅच ठरल्याच वावगं वाटायला नको. सूर्यकुमार यादव ( ०) व तिलक वर्मा ( ६) हे अपयशी ठरल्याने मुंबईवर दडपण आले होते, परंतु कर्णधार हार्दिक व डेव्हिडने ६० धावांची भागीदारी केली. हार्दिक ३९ धावांवर नॉर्खियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. दिल्लीच्या गोलंदाजांनी शेवटच्या ३ षटकांत भरपूर अतिरिक्त धावा दिल्या. नॉर्खियाने टाकलेले १८वे षटक १० चेंडूंचे राहिले.
इशांत शर्माने टाकलेल्या १९व्या षटकातही डेव्हिड व रोमारियो यांनी १९ धावा चोपल्या. २०व्या षटकात नॉर्खियाची पार धुळधाण करून टाकली. रोमारियोने चौकाराने सुरूवात केली आणि त्यानंतर सलग तीन षटकार खेचले. पाचव्या व सहाव्या चेंडूवर चौकार व षटकार खेचून त्याने मुंबईला ५ बाद २३४ धावांपर्यंत पोहोचवले. नॉर्खियाचे हे षटक आयपीएल इतिहासातील सहावे महागडे षटक ठरले
Web Title: IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : 𝗕𝗹𝗼𝗰𝗸𝗯𝘂𝘀𝘁𝗲𝗿 𝗙𝗶𝗻𝗶𝘀𝗵 by ROMARIO SHEPHERD, 39* runs in 10 balls with 4,6,6,6,4,6 in the Final over against ANRICH NORTJE, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.