IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभव पत्करावे लागले. रोहित शर्माकडून कॅप्टन्सी काढून घेतल्यामुळे फॅन्स प्रचंड नाराज आहेत आणि त्याचा राग हार्दिकवर निघताना दिसतोय... आज वानखेडेवर १८ हजार चिमुरड्यांच्या तोंडावरही मुंबईचा राजा, रोहित शर्मा... हेच होते. पण, आजच्या सामन्यात नेटिझन्सनी हार्दिकला ट्रोल करण्यासाठी चांगले कारण शोधले..
६,४,४,६,६,६,४,६! 'ओ'मारियो... शेफर्डचे कॅरेबियन वादळ, १० चेंडूंत तुंब्बळ फटकेबाजी, Video
रोहित शर्मा ( ४९) व इशान किशन ( ४२) या सेट फलंदाजांना अक्षर पटलेने बाद केले. अक्षरने स्वतःच्याच गोलंदाजीवर इशानचा अफलातून रिटर्न कॅच घेतला. सूर्यकुमार यादव ( ०) व तिलक वर्मा ( ६) हे अपयशी ठरल्याने मुंबईवर दडपण आले होते, परंतु कर्णधार हार्दिक ( ३९) व डेव्हिडने ६० धावांची भागीदारी करून दिल्लीला आव्हान दिले. हार्दिक ३९ धावांवर नॉर्खियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. इशांत शर्माने टाकलेल्या १९व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर ४, ६ धावा आल्या. त्यानंतर २०व्या षटकात नॉर्खियाच्या गोलंदाजीवर शेफर्डने ४,६,६,६,४,६ अशा ३२ धावा कुटल्या. नॉर्खियाचे हे षटक यंदाच्या पर्वातील महागडे षटक ठरले. MI ने शेवटच्या ४ षटकांत ८४ धावा चोपल्या आणि ५ बाद २३४ धावा उभ्या केल्या.
रोमारियो शेफर्डच्या ३९ धावा हार्दिकला ट्रोल करण्याचे निमित्त ठरले.. शेफर्डने १० चेंडूंत नाबाद ३९ धावा केल्या, तेच हार्दिकला ३३ चेंडूंत ३९ धावा करता आल्या.
Web Title: IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : For Mumbai Indians, Romario Shepherd - 39 runs 10 balls & Hardik Pandya - 39 runs 33 balls. Fans trolled MI captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.