मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; रोमारियो शेफर्डच्या ऑल राऊंड खेळाने जिंकली मनं 

मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील पहिला विजय पक्का केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 07:14 PM2024-04-07T19:14:18+5:302024-04-07T19:17:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : MUMBAI INDIANS BEAT DELHI CAPITALS BY 28 RUNS - THE FIRST WIN OF THIS SEASON.Romario Shepherd's all-round game won hearts | मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; रोमारियो शेफर्डच्या ऑल राऊंड खेळाने जिंकली मनं 

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; रोमारियो शेफर्डच्या ऑल राऊंड खेळाने जिंकली मनं 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील पहिला विजय पक्का केला. रोमारियो शेफर्डच्या ९ चेंडूंत नाबाद ३९ धावा या विजयात निर्णायक ठरल्या. २३४ धावांचे आव्हान उभे करूनही दिल्ली कॅपिटल्सच्या त्रित्सान स्तब्सने मुंबईच्या चाहत्यांना टेंशन दिले होते. स्तब्सला शेवटच्या षटकात स्ट्राईक न मिळाल्याने दिल्लीची हार पक्की झाली, परंतु मुंबईला शेवटच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. 

जसप्रीत बुमराहचा 'गेम चेंजर' Yorker, पृथ्वी शॉ फिरला गरगर; IPL 2024 मधील सर्वोत्तम चेंडू


शेफर्डने त्याच्या पहिल्याच षटकात दिल्लीला धक्का देताना डेव्हिड वॉर्नरला ( १०) चतुराईने माघारी पाठवले. पृथ्वी शॉ आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूंत ८८ धावा जोडल्या. जसप्रीत बुमराहने भन्नाट यॉर्करवर पृथ्वीचा ( ६६) त्रिफळा उडवून सामना फिरवला. बुमराहने त्याच्या पुढच्या षटकात आणखी एक सेट फलंदाज पोरेल ( ४१) याला बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला. चेंडू व धावा यांतील अंतर प्रचंड वाढले होते आणि त्या दडपणार रिषभ पंत ( १) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.  


फलंदाजीत बढती मिळालेल्ला त्रिस्तान स्तब्सने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, १२ चेंडूंत ५५ धावा DC ला विजयासाठी हव्या होत्या. स्तब्सने १९व्या षटकात शेफर्डच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार खेचले. १८.२ षटकांत मुंबईच्या ५ बाद १८९ धावा होत्या आणि दिल्लीच्या ४ बाद १९२ झाल्या. पण, चौथ्या चेंडूवर इशान किशनने चतुराईने अक्षर पटेलला (८) रन आऊट करून सामन्यात रंगत आणली.  ७ चेंडूंत ४० धावा हव्या असताना स्तब्सने षटकार खेचला, परंतु अखेरच्या षटकात स्ट्राईक ललित यादवकडे गेली. ललितने पहिल्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ५ चेंडूंत ३२ धावा दिल्लीला करायच्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर स्तब्स बाद झाला. तो २७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला. गेराल्ड कोएत्झीने सलग दोन चेंडूवर दोन धक्के दिले आणि शेवटच्या षटकात ३ विकेट घेतल्या. दिल्लीला ८ बाद २०५ धावा करता आल्या आणि २९ धावांनी सामना जिंकला. 


तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ४९) व इशान किशन ( ४२) यांना बाद करून अक्षर पटलेने मुंबईला मोठे धक्के दिले. सूर्यकुमार यादव ( ०) व तिलक वर्मा ( ६) हे अपयशी ठरले. कर्णधार हार्दिक ( ३९) व टीम डेव्हिड यांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. रोमारियो शेफर्डने शेवटच्या षटकात ४,६,६,६,४,६ अशा ३२ धावा कुटल्या आणि संघाला ५ बाद २३४ धावांपर्यंत पोहोचवले. डेव्हिडने २१ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४५ धावा केल्या, तर शेफर्टने १० चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी केली. 

Web Title: IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : MUMBAI INDIANS BEAT DELHI CAPITALS BY 28 RUNS - THE FIRST WIN OF THIS SEASON.Romario Shepherd's all-round game won hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.