रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम

MI vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 04:01 PM2024-04-07T16:01:50+5:302024-04-07T16:02:52+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : Mumbai is 80/1 after seven overs, Rohit Sharma ( 49) became a first indian to score 1500+ Boundaries in T20s, Ishan Kishan has completed 4500 runs in T20s | रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम

रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi :  इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आज विजयाचा विश्वास व्यक्त केला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. DC च्या संघात मिचेल मार्श व रसिख यांच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये झाय रिचर्डसन व ललित यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. MI च्या ताफ्यात ३ बदल पाहायला मिळाले आहे. सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनाने MI चा उत्साह वाढला आहे आणि त्याच्यासह रोमारिसो शेफर्ड व मोहम्मद नबी यांची एन्ट्री झाली आहे. नमन धीर, क्वेमा मफाका व डेवॉल्ड ब्रेव्हिस यांना आज बाहेर बसावे लागले. 


रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी MI ला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने ट्वेंटी-२०त एकूण १५००+ चौकार-षटकार खेचणाऱ्या सहा फलंदाजांमध्ये आपले नाव सहभागी केले.  ख्रिस गेल ( २१९६), अॅलेक्स हेल्स ( १८५५), डेव्हिड वॉर्नर ( १६७३), किरॉन पोलार्ड ( १६७०), आरोन फिंच ( १५५७) व रोहित शर्मा ( १५०३*) असा क्रम येतो. इशान किशननेही ट्वेंटी-२०त ४५०० धावांचा टप्पा आज ओलांडला.

  • रोहितने झाय रिचर्डसनला मारलेले दोन खणखणीत षटकार पाहण्यासारखे होते. आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध १०००हून अधिक धावांचा विक्रम आज रोहितने नावावर केल्या. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हा पराक्रम केला.
  • शिखर धवन ( वि. CSK), विराट कोहली ( वि. DC, CSK ), डेव्हिड वॉर्नर ( वि. PBKS, KKR) रोहित शर्मा ( वि. KKR, DC) यांनी हा पराक्रम केला.  दोन संघांविरुद्ध १०००+ धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. 

रोहित २७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. इशानसह ८० धावांची भागीदारी संपुष्टात आली. 

दिल्ली कॅपिटल्स - पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिषभ पंत, त्रिस्तान स्तब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाय रिचर्डसन, एनरिच नॉर्खिया, इशांत शर्मा, खलील अहमद   

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, पियुष चावला, गेलार्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह  

Web Title: IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : Mumbai is 80/1 after seven overs, Rohit Sharma ( 49) became a first indian to score 1500+ Boundaries in T20s, Ishan Kishan has completed 4500 runs in T20s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.