IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली, परंतु दिल्ली कॅपिटल्सच्या अक्षर पटेलने दोघांनाही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर माघारी पाठवले. इशानने मारलेला खणखणीत फटक्यावर वीजेच्या वेगाने आलेला चेंडू अक्षरने स्वतःच्याच गोलंदाजीवर अफलातून पद्धतीने टिपला.
रोहित शर्माचा 'पॉवर प्ले'! ट्वेंटी-२०त वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणारा पहिला भारतीय, झटक्यात ३ विक्रम
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनाने मुंबई इंडियन्सचा उत्साह वाढला होता. त्यात रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी MI ला दमदार सुरुवात करून दिली. इशाननेही ट्वेंटी-२०त ४५०० धावांचा टप्पा आज ओलांडला. रोहितने झाय रिचर्डसनला मारलेले दोन खणखणीत षटकार पाहण्यासारखे होते. त्याने या फटकेबाजीसह आयपीएलमध्ये DC विरुद्ध १००० धावांचा टप्पा ओलांडला. असा पराक्रम करणारा तो चौथा फलंदाज ठरला, परंतु शिखर धवन व विराट कोहली यांच्यानंतर दोन संघाविरुद्ध असा पराक्रम रोहितने करून दाखवला. रोहित २७ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावांवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. इशानसह ८० धावांची भागीदारी संपुष्टात आली.