मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी?

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हा आतापर्यंत एकही सामना जिंकलेला एकमेव संघ आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 03:40 PM2024-04-01T15:40:54+5:302024-04-01T15:41:17+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Fans started gathering at the Outside of Wankhede stadium and chanting "Mumbai Ka Raja, Rohit Sharma, Video  | मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी?

मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हा आतापर्यंत एकही सामना जिंकलेला एकमेव संघ आहे. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली Mumbai Indians ने खेळणे चाहत्यांना काही आवडलेले दिसत नाही. त्यामुळे अहमदाबाद व हैदराबाद येथे झालेल्या लढतीत हार्दिकच्या नावाने हूटींग झालेले पाहायला मिळाले. त्याला चाहत्यांचा रोषाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्स यंदाच्या पर्वातील त्यांच्या पहिलाच घरचा सामना खेळायला मैदानावर उतरणार आहे. पण, याही सामन्यात चाहत्यांचा रोष अधिक वाढलेला पाहायला मिळेल आणि त्याचे संकेत आधीच मिळत आहेत...


रोहित शर्माकडून कर्णधारपद स्वीकारल्यानंतर हार्दिकवर टीका होताना दिसतेय. गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलामीच्या सामन्यात चाहत्यांनी पांड्यावर टीका केली. राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान ३० वर्षीय पांड्याच्या वाट्याला असाच अनुभव आला. असेच चित्र मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमिवर मुंबई क्रिकेट असोसिएशन सज्ज असल्याचे वृत्त आले होते. आज मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. 


''हार्दिकला नापसंती दर्शवणाऱ्या प्रेक्षकांना रोखण्यासाठी MCA ने अधिक सुरक्षारक्षक नेमल्याचे वृत्त खोटे आहे. ही निराधार अफवा आहे आणि अशा कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, एमसीए बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहोत,''असे MCA ने आधीच स्पष्ट केले आहे. पण, वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीसाठी आतापासूनच मोठी गर्दी झालेली पाहायला मिळतेय आणि रोहित शर्माचे चाहते जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ आजचा नसून जुना असल्याची माहिती समोर येत आहे. तरीही रोहितचे फॅन हार्दिकचा कॅप्टन म्हणून स्वीकार करतील की त्याच्यावर टीका करतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



 

Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Fans started gathering at the Outside of Wankhede stadium and chanting "Mumbai Ka Raja, Rohit Sharma, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.