W, W, W! रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे ३ 'Golden Duck', वानखेडेवर सन्नाटा; ट्रेंट बोल्टचा मारा

ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर रोहितचा झेल उडाला आणि यष्टिरक्षक संजू सॅमसनने सुरेखरित्या तो टिपला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 07:45 PM2024-04-01T19:45:47+5:302024-04-01T19:49:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Golden duck for Rohit Sharma, Naman Dhir & Dewald Brevis, Trent Boult took three wickets, Video  | W, W, W! रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे ३ 'Golden Duck', वानखेडेवर सन्नाटा; ट्रेंट बोल्टचा मारा

W, W, W! रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे ३ 'Golden Duck', वानखेडेवर सन्नाटा; ट्रेंट बोल्टचा मारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : हार्दिक पांड्याला डिवचण्यासाठी चाहत्यांनी रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावाचा गजर केला खरा, परंतु हिटमॅनने त्यांचा पहिल्याच चेंडूवर पोपट केला. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर रोहितचा झेल उडाला आणि यष्टिरक्षक संजू सॅमसनने सुरेखरित्या तो टिपला. पुढच्याच चेंडूवर नमन धीर पायचीत झाल्याने मुंबईची अवस्था २ बाद १ धाव अशी दयनीय झाली. रोहितच्या विकेटनंतर वानखेडे स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली. पुढच्या षटकात बोल्टला हॅटट्रिकची संधी होती, परंतु ती हुकली. मात्र त्याने इम्पॅक्ट खेळाडू डेवॉल्ड ब्रेव्हिसला गोल्डन डकवर माघारी पाठवून मुंबईला १४ धावांवर तिसरा धक्का दिला. 

मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकडून पांड्याचे 'हार्दिक' स्वागत नाहीच; कर्णधाराचा चेहरा पडला


इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सोमवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स  ( MI vs RR ) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर ( Wankhede) सामना होतोय. नेतृत्वबदलानंतर MI पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya) इथेही चाहत्यांकडून हूटिंग झालेले दिसले. कर्णधार म्हणून हार्दिकचा हा पन्नासावा आयपीएल सामना आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीव्ही प्रेझेंटर संजय मांजरेकर यांनी जेव्हा हार्दिकसाठी चाहत्यांना चिअर करण्याचे आवाहन केले, तेव्हा त्यांच्याकडून हूटिंग केले गेले. संपूर्ण स्टेडियमवर रोहितचे नावच दणाणले होते आणि प्रेक्षकांची वागणूक पाहून हार्दिकचा चेहरा पडलेला दिसला.


आयपीएलमध्ये सर्वाधिक १७वेळा शून्यावर बाद होण्याच्या दिशेन कार्तिकच्या विक्रमाशी आज रोहितने बरोबरी केली. ग्लेन मॅक्सवेल १५ वेळा भोपळ्यावर बाद झालाय. 


 
मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी, पियूष चावला, आकाश मढवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका; इम्पॅक्ट खेळाडू - नेहाल वढेरा, शाम्स मुलानी, रोमारिओ शेफर्ड, नुवान तुषारा, डेवॉल्ड ब्रेव्हिस 


राजस्थान रॉयल्स - यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल; इम्पॅक्ट खेळाडू - कुलदीप सेन, शुभम दुबे, तनुष कोटियान, रोव्हमन पॉवेल. अबीद मुश्ताक. 
 

Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Golden duck for Rohit Sharma, Naman Dhir & Dewald Brevis, Trent Boult took three wickets, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.