IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई इंडियन्सची आघाडीची फळी ढेपाळली आणि त्यानंतर युझवेंद्र चहलच्या फिरकीने यजमानांची कोंडी केली. आघाडीचे ३ फलंदाज 'गोल्डन डक'वर बोल्टने माघारी पाठवले. कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) तिलक वर्मासह डाव सावरला, परंतु राजस्थान रॉयल्सचे डावपेच यशस्वी ठरले. संजू सॅमसन, रोव्हमन पॉवेल व शिमरोन हेटमायर यांच्या अफालतून झेल्सनी RRच्या गोलंदाजांना यश मिळवून दिले.
Video : मुंबई इंडियन्सच्या फॅन्सकडून पांड्याचे 'हार्दिक' स्वागत नाहीच; कर्णधाराचा चेहरा पडला
४ फलंदाज अवघ्या २० धावांवर गमावल्यानंतर पांड्या व तिलक यांनी अर्धशतकी भागीदारी करून राजस्थान रॉयल्सला आव्हान दिले होते. पण, दोन अफलातून झेलने पुन्हा पारडे राजस्थानच्या बाजूने झुकले. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस ( इम्पॅक्ट खेळाडू) हे तिघेही ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर गोल्डन डकवर माघारी परतले. इशान किशनने ( १६) काही चांगले फटके मारले, परंतु नांद्रे बर्गरने चौथा धक्का दिला. हार्दिक व तिलक यांची ३५ चेंडूंवर ५६ धावांची भागीदारी युझवेंद्र चहलने तोडली. हार्दिक २१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ३४ धावांवर झेलबाद झाला.
MI ने पियूष चावलाला फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले. पण, आवेश खानच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात चावला ( ३) बाद झाला. शिमरोन हेटमायरने अफलातून झेल घेतला. चहलच्या पुढच्या षटकात आर अश्विनने दमदार झेल घेत तिलक वर्माला ( ३२) माघारी पाठवले. चहलने फिरकीची कमाल दाखवताना गेराल्ड कोएत्झीला ( ४) चूक करण्यास भाग पाडले. बोल्टने ४-०-२२-३ अशी आणि चहलनेही ४-०-११-३ असी उल्लेखनीय स्पेल टाकली. आयपीएलमध्ये सर्वाधिक २० वेळा सामन्यात ३ विकेट्स घेण्याच्या जसप्रीत बुमराहच्या विक्रमाशी चहलने बरोबरी केली. टीम डेव्हिड ( १७) अपयशी ठरला आणि बर्गरने त्याला बाद केले.
मुंबई इंडियन्सला २० षटकांत ९ बाद १२५ धावा करता आल्या.
Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Trent Boult & Yuzvendra Chahal took 3 wickets each, MI set 126 runs target for RR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.