IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update Marathi : आयपीएल २०२४ मधील घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. २० धावांवर ४ विकेट्स गेल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) मैदानावर आला आणि चाहत्यांनी त्याचे स्वागत हूटिंगने केले. पण, याला हार्दिकने आपल्या फटकेबाजीने उत्तर दिले आणि विरोधक प्रेक्षक समर्थक झाले. आता हार्दिकच्या प्रत्येक फटक्यावर चाहते टाळ्यांचा कडकडाट करताना दिसले. चाहत्यांचे रंग लगेच बदलले...
W, W, W! रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे ३ 'Golden Duck', वानखेडेवर सन्नाटा; ट्रेंट बोल्टचा मारा
हार्दिक पांड्याला डिवचण्यासाठी चाहत्यांनी रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावाचा गजर केला खरा, परंतु हिटमॅनने त्यांचा पहिल्याच चेंडूवर पोपट केला. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर रोहितचा झेल उडाला आणि यष्टिरक्षक संजू सॅमसनने सुरेखरित्या तो टिपला. पुढच्याच चेंडूवर नमन धीर पायचीत झाला. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या डेवॉल्ड ब्रेव्हिसला तिसऱ्या षटकात बोल्टने गोल्डन डकवर माघारी पाठवले. आघाडीचे तिन्ही फलंदाज गोल्डन डकवर बाद होण्याची ही आयपीएलमधील सहावी वेळ ठरली. आयपीएलमध्ये सर्वाधिक १७वेळा शून्यावर बाद होण्याच्या दिशेन कार्तिकच्या विक्रमाशी आज रोहितने बरोबरी केली.
इशान किशनने दुसऱ्या बाजूने काही चांगले फटके मारले, परंतु चौथ्या षटकात त्याचीही विकेट पडली. नांद्रे बर्गरने मुंबई इंडियन्सला चौथा धक्का देताना इशानला ( १६) माघारी पाठवले. झेलबाद होण्यापूर्वीच्या चेंडूवर इशान पायचीत झाला असता, परंतु RR ने DRS न घेतल्याने तो वाचला. मुंबईची अवस्था ४ बाद २० अशी दयनीय झाली. बोल्डच्या तिसऱ्या षटकात तिलक वर्माचा झेल उडाला होता, परंतु युझवेंद्र चहल प्रयत्न करूनही चेंडूपर्यंत पोहोचू न शकल्याने झेल चुकला.
कर्णधार हार्दिक पांड्याचे चाहत्यांकडून स्वागत हूटिंगने झाले, परंतु त्याची फटकेबाजी पाहून तेच चाहते त्याचा उत्साह वाढवताना दिसले. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात हार्दिकने २,४,४,०,४,२ असे फटके खेचल्याने मुंबई ४६ धावांपर्यंत पोहोचले.
Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Wankhede going mad after the boundaries from Hardik Pandya, MI got 46 runs in 6 overs and lost 4 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.