IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : विराट कोहलीची फटकेबाजी पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. फॅफ ड्यू प्लेसिस व रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांनी RCB ला सावरले. पण, जसप्रीत बुमराहने पुन्हा धक्के दिले. मात्र, दिनेश कार्तिकच्या ( Dinesh Karthik) फटकेबाजीने MI च्या डोक्याला शॉट दिला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २३ धावांवर दोन धक्के दिल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ थोडा रिलॅक्स झाला. विराट कोहली ( ३) व पदार्पणवीर विल जॅक्स ( ८) यांना अनुक्रमे जसप्रीत बुमराह व आकाश मढवाल यांनी माघारी पाठवले. जसप्रीतने आयपीएलमध्ये विराटला पाचव्यांदा बाद केले. पण, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व रजत पाटीदार यांनी चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी ८२ धावा जोडल्या. हार्दिकच्या पहिल्याच षटकात रजतने मारलेला खणखणीत षटकार पाहून विराटही थक्क झाला. रजत २६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला आणि फॅफ ड्यू प्लेसिससह त्याची ८२ ( ४७ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली.
ग्लेन मॅक्सवेलने ( ०) अपयशाचा पाढा याही सामन्यात वाचला. त्याची विकेट मिळवण्यासाठी श्रेयस गोपाळला आणण्याचा डाव यशस्वी ठरला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक १७ वेळा भोपळ्यावर बाद होण्याच्या
दिनेश कार्तिक व रोहित शर्मा यांच्या नकोशा विक्रमाची मॅक्सवेलने बरोबरी केली. फॅफने यंदाच्या पर्वातील पहिले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ३३ चेंडू खेळले. दिनेश कार्तिकने मढवालच्या षटकात यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून ४ चौकार मिळवले. कार्तिक व ड्यू प्लेसिस यांची २६ चेंडूंवरील ४५ धावांची भागीदारी जसप्रीतने तोडली. ४० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारासह ६१ धावा करणाऱ्या ड्यू प्लेसिसचा सुरेख झेल टीम डेव्हिडने टिपला.
Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Dinesh Karthik hit 4 boundaries behind the keeper in a single over, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.