IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारताना प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. पियूष चावलाच्या जागी आज MI च्या ताफ्यात श्रेयस गोपाळ खेळणार आहेत. RCB च्या ताफ्यात ३ बदल केले गेले आहेत. विल जॅक, महिपाल लोम्रोर व वियजकुमार व्यैशाक यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. हार्दिकने पहिले षटक मोहम्मद नबीकडून टाकून घेतले आणि त्यावर फॅफ ड्यू प्लेसिस व विराट कोहली यांनी ७ धावा काढल्या.
विराट कोहली यंदाच्या पर्वात ३०० हून अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू आहे, परंतु त्याला सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने RCB ला केवळ १ विजय मिळवता आला आहे. मागील सामन्यात विराटने शतक झळकावूनही बंगळुरुला जिंकता आले नव्हते. आज वानखेडेवर त्याच्या समर्थनात मोठा चाहता वर्ग मैदानावर उपस्थित होता. जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्या षटकात MI ला मोठे यश मिळवून दिले. त्याने विराटला ( ३) यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती झेलबाद केले. आजच्या सामन्यात विराटने १० धावा केल्या असत्या तर तो ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला असता, पण आता त्याला प्रतीक्षा पाहावी लागेल.
ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
ख्रिस गेल - ४६३ सामने, १४५६२ धावा
शोएब मलिक - ५४२ सामने, १३३६० धावा
किरॉन पोलार्ड - ६६० सामने, १२९०० धावा
अॅलेक्स हेल्स - ४४९ सामने, १२३१९ धावा
विराट कोहली - ३८२ सामने, १२३१३* धावा
Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Virat Kohli goes for 3 of 9 balls, Jasprit Bumrah gates wickets, Will Jacsk ( 8) gone, RCB 2 loss 23, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.