IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामना अम्पायरच्या चुकीच्या निर्णयांमुळे गाजतोय. त्यामुळे विराट कोहली ( Virat Kohli) प्रचंड संतापलेला दिसला. नेटकऱ्यांनीही सोशल मीडियावर अम्पायर नितीन मेनन यांना चांगलेच धुतले...
विराट कोहली ( ३) व पदार्पणवीर विल जॅक्स ( ८) हे अपयशी ठरले तरी रजत पाटीदार, कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व दिनेश कार्तिक यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिली. ड्यू प्लेसिस ( ६१) व रजत ( ५०) यांनी ८२ धावा जोडून संघाचा डाव सारवला. पण, ग्लेन मॅक्सवेलने ( ०) अपयशाचा पाढा वाचला. पण, दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली. कार्तिकने २३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५३ धावा करून संघाला ८ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले. या फटकेबाजीत MI चा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहा चमकला आणि त्याने ४ षटकांत २१ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये त्याने दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या.
२०व्या षटकाचा दुसरा चेंडू फुलटॉस होता आणि कार्तिकने मिड ऑनच्या दिशेने फटका मारला. तो अम्पायरकडे नो बॉलच्या निर्णयासाठी पाहत होता. अम्पयारने नो बॉल न दिल्याने DRS घेतला गेला, तिसऱ्या अम्पायरनेही नो बॉल न दिल्याने विराट संतापला. या सामन्यात आधीच RCB चा एक चौकार नाकारला गेला, वाईड चेंडू दिला नाही गेला आणि अम्पायर कॉलमुळे RCB ची एक विकेटही गेली. त्यामुळे नेटकरी संतापले आहेत.
Web Title: IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Virat Kohli unhappy after 3rd umpire turned down the No Ball call, 4 decision goes against RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.