IPL Opening Ceremony | चेन्नई: आजपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होत आहे. (IPL 2024 Latest News) चेन्नईत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK Live) यांच्यातील लढतीने या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. सलामीच्या सामन्यापूर्वी ओपनिंग सेरेमनी पार पडली. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांनी ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म केले. संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले आहे. गायक सोनू निगमने देखील उपस्थित प्रेक्षकांचे गायनाच्या माध्यमातून मनोरंजन केले. त्याने वंदे मातरम गायले. वंदे मातरम नंतर प्रेक्षकांना बॉलिवूडची हिट गाणी ऐकायला मिळाली. एआर रहमान, नीती मेहन आणि मोहित चौहान यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम गाजवला. (IPL 2024 Opening Ceremony Live)
दरम्यान, कॅप्टन कूल धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने पाचवेळा ट्रॉफी जिंकली. याशिवाय सर्वाधिकवेळा अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ म्हणूनही चेन्नईच्या संघाची ख्याती आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा किताब जिंकवून दिला. पण, मुंबईच्या फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवली आहे.
आयपीएलचा यंदाचा हंगाम विविध कारणांनी खास आहे. कारण चार संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघात हार्दिक पांड्याची घरवापसी झाली असून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा प्रथमच हार्दिकच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. गुजरात टायटन्सने शुबमन गिलला कर्णधार केले आहे, तर पॅट कमिन्स हैदराबाद आणि ऋतुराज सीएसकेचा कर्णधार झाला आहे.