IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४३ धावांत २ विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहली व रजत पाटीदार यांनी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रजत फटकेबाजी करताना विराट शांत होता, परंतु रजतची विकेट पडली अन् विराटने आतषबाजी सुरू केली. सॅम करनला त्याने गुडघ्यावर बसून खेचलेला ९२ मीटर लांब षटकार पाहण्यासारखा होता. त्याला नंतर कॅमेरून ग्रीन यानेही उत्तम साथ दिली आणि RCB ला १७व्या षटकातच दोनशेपार नेले.
पंजाबचा कर्णधार सॅम करन याने टॉस जिंकून RCB ला प्रथम फलंदाजीला बोलावले. RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ९) आणि विल जॅक्स ( १२) यांना विद्वथ कावेरप्पाने ( Vidwath Kaverappa) माघारी पाठवले. PBKS च्या खेळाडूंनी पॉवर प्लेमध्ये विराट कोहलीला दोन जीवदान दिले. रजत पाटीदार याचाही एक झेल टाकला. कागिसो रबाडाशिवाय मैदानावर उतरलेल्या पंजाबला विराट व रजत यांनी बेक्कार चोपले. रजतने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सॅम करनने ७६ धावांची भागीदारी तोडली. रजत २३ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५५ धावांवर झेलबाद झाला. बंगळुरूने १० षटकांत ३ बाद ११९ धावा उभ्या केल्या आणि धर्मशालामध्ये पाऊस सुरू झाला, त्यामुळे काहीकाळ सामना थाबंवण्यात आला.
पदार्पणवीर विद्वथने ४ षटकांत ३६ धावा देऊन २ महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. विराटने ३२ चेंडूंत यंदाच्या पर्वातील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. विराटने ५८वी धाव पूर्ण करताच यंदाच्या आयपीएलमध्ये ६०० धावांचा टप्पा गाठला. आयपीएलच्या ४ पर्वात ६०० धावा करणारा लोकेश राहुलनंतर विराट दुसरा फलंदाज ठरला. पंजाबविरुद्ध त्याने आयपीएलमध्ये १००० धावा करण्याचा पहिला मानही पटकावला. तीन ( दिल्ली, चेन्नई व पंजाब) प्रतिस्पर्धींविरुद्ध आयपीएलमध्ये १०००+ धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. डेव्हिड वॉर्नर ( पंजाब व कोलकाता) आणि रोहित शर्मा ( कोलकाता, दिल्ली) यांनी दोन संघांविरुद्ध असा पराक्रम करता आला आहे.
विराट आणि ग्रीन यांनी ४२ चेंडूंत ९७ धावांची आतषबाजी भागीदारी केली. विराट ४७ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ९२ धावांवर झेलबाद झाला. अर्शदीप सिंगने ही विकेट घेतली.
Web Title: IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : Virat Kohli only player to have scored 1000+ runs against 3 opposition, he scored 92 runs in 47 balls with 7 fours and 6 sixes, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.