Join us  

विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य

विराट कोहलीने आज १९६ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करून टीकाकारांना जोरदार उत्तर दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 9:49 PM

Open in App

IPL 2024, PBKS vs RCB Live Marathi : विराट कोहलीने आज १९६ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करून टीकाकारांना जोरदार उत्तर दिले. २ बाद ४३ धावांवरून विराट व रजत पाटीदार यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरला सावरले. त्यानंतर विराट व कॅमेरून ग्रीन ही जोडी उभी राहिली आणि पंजाब किंग्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. 

१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक

 पंजाबचा कर्णधार सॅम करन याने टॉस जिंकून RCB ला प्रथम फलंदाजीला बोलावले.  पदार्पणवीर विद्वथ कावेरप्पाने RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ९) आणि विल जॅक्स ( १२) यांना माघारी पाठवले. PBKS च्या खेळाडूंनी पॉवर प्लेमध्ये विराट कोहलीला दोन जीवदान दिले. रजत पाटीदार याचाही एक झेल टाकला. १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सॅम करनने ७६ धावांची भागीदारी तोडली. रजत २३ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ५५ धावांवर झेलबाद झाला.   पदार्पणवीर विद्वथने ४ षटकांत ३६ धावा देऊन २ महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या. विराट आणि ग्रीन यांनी ४२ चेंडूंत ९७ धावांची आतषबाजी भागीदारी केली. विराट ४७ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ९२ धावांवर झेलबाद झाला. अर्शदीप सिंगने ही विकेट घेतली.   विराटच्या विकेटनंतर धावगतीला ब्रेक लागेल असे वाटले होते. पण, सेट झालेल्या ग्रीन व फिनिशर दिनेश कार्तिक १० चेंडूंत २७ धावा जोडल्या. राहुल चहरला १९वे षटक देण्याचा पंजाबचा डाव फसला अन् बंगळुरूने २१ धावा चोपल्या. २०व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कार्तिक ( १८) झेलबाद झाला. हर्षलने चौथ्या चेंडूवर महिपाल लोम्रोरचा ( ०) त्रिफळा उडवला. शेवटच्या चेंडूवर ग्रीनचा अफलातून झेल कुरनने टीपला. ग्रीन २७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर बाद झाला आणि बंगळुरूने ७ बाद २४१ धावा उभ्या केल्या. हर्षलने शेवटच्या षटकात तीन विकेट्स घेतल्या. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्स