IPL 2024 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी १९ डिसेंबरला दुबईत होणाऱ्या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. IPL Auction 2024 साठी तब्बल ११६६ खेळाडूंनी स्वत:चे नाव नोंदविले होती आणि त्यात ८३० भारतीय तर ३३६ विदेशी खेळाडूंचा समावेश होता. पण, सर्व फ्रँचायझींकडून आलेल्या शिफारसींवरून यापैकी केवळ ३३३ खेळाडूंवर आयपीएल लिलावात बोली लावली जाणार आहे. मुंबई इंडियन्सने रिलीज केलेला इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने लिलाव प्रक्रियेसाठी नाव नोंदवलेले नाही.
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, गेराल्ड कोएत्झी आणि राचिन रवींद्र यांच्यावर तगडी बोली लागू शकते, तर भारतीयांमध्ये शार्दूल ठाकूर, हर्षल पटेल, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट ही मोठी नावे आहेत. आयपीएलने काल जाहीर केलेल्या अंतिम ३३३ खेळाडूंमध्ये २१४ भारतीय आहेत आणि २ संलग्न देशांसह ११९ परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. यापैकी ११६ कॅप्ड्, २१५ अनकॅप्ड खेळाडू आहेत. यापैकी केवळ ७७ खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे आणि त्यापैकी ३० जागा परदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत. २३ खेळाडूंसाठी २ कोटी मुळ किंमत ठेवली गेली आहे, १३ खेळाडूंसाठी १.५ कोटी मुळ किंमत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजल्यापासून लिलावाला सुरुवात होणार आहे.
कोणत्या संघात किती रिक्त जागा अन् किती रुपये शिल्लक?