इंडियन प्रीमिअर लीगचं आणखी एक पर्व यशस्वीरित्या पार पडलं. कोलकाता नाईट रायडर्सनेआयपीएल २०२४ चं जेतेपद नावावर करताना १० वर्षांचा दुष्काळ संपवला. २०१२ व २०१४ नंतर त्यांनी तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. KKR ने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर सहज विजय मिळवला. या विजेतेपदानंतर KKR ला ट्रॉफीसह २० कोटी बक्षीस रक्कम दिली गेली, तर उपविजेत्या SRH ला १३ कोटी दिले गेले. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण ४६.५ कोटींच्या बक्षीस रकमेचे वाटप केले गेले.
राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे अनुक्रमे तिसरे व चौथे राहिले. संजू सॅमसनच्या संघाला ७ कोटी, तर RCB ला ६.५ कोटी रुपये दिले गेले. RCB च्या विराट कोहलीने ऑरेंज कॅप जिंकली, तर पंजाब किंग्सच्या हर्षल पटेलने पर्पल कॅप जिंकली... या दोघांना प्रत्येकी १० लाख रुपये दिले गेले. विराटने या पर्वात १५ सामन्यांत ६१.७५च्या सरासरीने सर्वाधिक ७४१ धावा केल्या. हर्षलने १४ सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या.
सनरायझर्सचा नितीश कुमार रेड्डी हा Emerging Player ठरला, तर KKR च्या सुनील नरीनने Most Valuable Player चा किताब पटकावला. नरीनने १५ सामन्यांत १८०.७४च्या स्ट्राईक रेटने ४८८ धावा चोपल्या. शिवाय त्याने गोलंदाजीत १७ विकेट्सही घेतल्या
पुरस्कार विजेत्यांची पूर्ण यादी
Orange Cap: विराट कोहली - ७४१ धावा ( १० लाख)
Purple Cap: हर्षल पटेल - २४ विकेट्स ( १० लाख)
Most Valuable Player of the season: सुनील नरीन ( १२ लाख)
Ultimate Fantasy Player of The Season: सुनील नरीन
सर्वाधिक चौकार - ट्रॅव्हिस हेड ( ६४)
सर्वाधिक षटकार - अभिषेक शर्मा ( ४२)
Striker of the season: जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( २३४.०४)
Emerging Player of the season: नितीश कुमार रेड्डी ( २० लाख)
Catch Of The Season: रमणदीप सिंग
Fair Play Award: SRH
Pitch and ground award: हैदराबाद क्रिकेट असोसिएशन
Web Title: IPL 2024 Prize Money: KKR Get Rs 20 Crore, SRH Rs 13 Crore, Here's the full list of award winners and prize money.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.