IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : तीन प्रमुख गोलंदाजांच्या गैरजहेरीतही चेन्नई सुपर किंग्सने १६७ धावांचा यशस्वी बचाव करून दाखवला. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात CSK ने बाजी मारून IPL 2024 Point Table मध्ये १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पण, या पराभवानं PBKS ची वाटचाल प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर जाण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आज अष्टपैलू ( ४३ धावा व ३ विकेट्स) कामगिरी करून चमकला. तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात दोन धक्के देऊन सामना सेट केला आणि १८ महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या सिमरजीत सिंगने जबरदस्त गोलंदाजी केली.
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video
तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टो ( ९) आणि रायली रुसो ( ०) यांचे त्रिफळे उडवले. पण, शशांक सिंग व प्रभसिमरन सिंग यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३६ चेंडूंत ५३ धावा जोडून पंजाबला सावरले. मिचेल सँटनरने ही जोडी तोडली आणि शशांक २७ धावांवर बाद झाला. पुढच्या षटकात रवींद्र जडेजाने PBKS चा आणखी एक सेट फलंदाज माघारी पाठवला. प्रभसिमरन ३० धावांवर झेलबाद झाला आणि पंजाबला ६८ धावांवर चौथा धक्का बसला. १८ महिन्यानंतर मैदानावर परतलेल्या सिमरजीत सिंगने पहिल्याच षटकात जितेश शर्माला ( ०) धोनीकरवी झेलबाद केले. धोनीचा हा आयपीएलमधील १५० वा झेल ठरला.
५ बाद ६९ वरून पंजाबला सावरण्याची जबाबदारी कर्णधार सॅम करनवर होती. १२ व्या षटकात मोईन अलीला पंजाबच्या कॅप्टनला जीवदान दिले, परंतु त्याचा फार उपयोग झाला नाही. रवींद्र जडेजाने पुढच्या षटकात करनला ( ७) मोठा फटका खेचून झेल देण्यास भाग पाडले. एका चेंडूच्या फरकाना जडेजाने पंजाबच्या आशुतोष शर्माला ( ३) माघारी पाठवले आणि त्यांची अवस्था ७ बाद ७८ अशी केली. जडेजाने ४ षटकांत २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने ६,४ खेचून सिमरजीतवर दडपण आणले, परंतु त्याने चतुराईने संथ चेंडू टाकून त्याला फसवले. हर्षल १२ धावांवर झेलबाद झाला.
तत्पूर्वी, CSK च्या फलंदाजीचा भार ऋतुराज गायकवाड ( ३२) , डॅरिल मिचेल ( ३०) व रवींद्र जडेजा ( ४३) यांनी उचलला. गायकवाड व डॅरिल मिचेल यांनी ५७ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूरने १७ धावा केल्या, पण महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. चेन्नईला ९ बाद १६७ धावाच करता आल्या. हर्षल पटेल ( ३-२४) व राहुल चहर ( ३-२३) यांनी प्रत्येकी तीन बळी टिपले, तर अर्शदीप सिंगने दोन व सॅम करनने एक विकेट घेतली.