IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : सलामीवीर अजिंक्य रहाणेचे अपयश हे ऋतुराज गायकवाडवर दडपण वाढवताना दिसतेय. चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात पुन्हा एकदा काही खास झालेली नाही. अजिंक्य ९ धावांवर माघारी परतल्यानंतर ऋतुराज व डॅरिल मिचेल यांनी डाव सावरला होता, पंरतु राहुल चहरने ( ३-२३) सामना फिरवला. मोईन अली, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी काही धावांचे योगदान देताना पंजाब किंग्ससमोर आव्हान उभे केले. MS Dhoni ची फटकेबाजी पाहण्याचं भाग्य आज धर्मशालाच्या चाहत्यांचे नव्हते. तो पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
अजिंक्य रहाणेला ( ९) सलामीला पाठवण्याचा CSK चा डाव पुन्हा फसला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर शिवम दुबेची बॅट थंड झालेली दिसली आणि आजही तो गोल्डन डकवर परतला. कर्णधार ऋतुराज गायकवाड व डॅरिल मिचेल यांनी भार सांभाळला होता, परंतु त्यांनाही पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. ऋतुराज व डॅरिल मिचेल यांनी ५७ धावांची भागीदारी करून संघाला ७ षटकांत १ बाद ६९ धावांपर्यंत पोहोचवले. स्ट्रॅटेजिक ब्रेकनंतर राहुल चहरने CSK ला सलग चेंडूंवर दोन धक्के दिले. ऋतुराज २१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३२ धावांवर झेलबाद झाला, तर शिवम शून्यावर माघारी परतला.
हर्षल पटेलने CSK चा सेट फलंदाज मिचेलला ( ३०) पायचीत केले. १ बाद ६९ वरून चेन्नईने ७५ धावांवर ४ विकेट्स गमावल्या. चेन्नईच्या धावांचा ओघ आटला होता आणि २७ चेंडूंनंतर त्यांना चौकार मारता आला. मोईन अली आणि रवींद्र जडेजा यांनी CSK फॅन्सच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु सॅम करनने चतुराईने ही २६ धावांची भागीदारी तोडली. अली १७ धावांवर झेलबाद झाला. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या मिचेल सँटनर ( ११) ला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात माघारी जावे लागले. चहरने त्याची डावातील तिसरी विकेट घेतली. शार्दूल ११ चेंडूंत १७ धावा करून माघारी परतला अन्
महेंद्रसिंग धोनी शेवटची ८ चेंडू खेळण्यासाठी मैदानावर आला. पण, हर्षल पटेलने पहिल्याच चेंडूवर MS Dhoni चा त्रिफळा उडवून CSK चाहत्यांना शांत केले.
जडेजा २६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. चेन्नईला ९ बाद १६७ धावाच करता आल्या.
Web Title: IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : MS Dhoni bowled on the very first ball! CSK surrender to Punjab Kings bowlers, set 168 runs target
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.