IPL 2024, Punjab Kings vs Chennai Super Kings Live Marathi : सलामीवीर अजिंक्य रहाणेचे अपयश हे ऋतुराज गायकवाडवर दडपण वाढवताना दिसतेय. चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात पुन्हा एकदा काही खास झालेली नाही. अजिंक्य ९ धावांवर माघारी परतल्यानंतर ऋतुराज व डॅरिल मिचेल यांनी डाव सावरला होता, पंरतु राहुल चहरने ( ३-२३) सामना फिरवला. मोईन अली, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी काही धावांचे योगदान देताना पंजाब किंग्ससमोर आव्हान उभे केले. MS Dhoni ची फटकेबाजी पाहण्याचं भाग्य आज धर्मशालाच्या चाहत्यांचे नव्हते. तो पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
अजिंक्य रहाणेला ( ९) सलामीला पाठवण्याचा CSK चा डाव पुन्हा फसला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर शिवम दुबेची बॅट थंड झालेली दिसली आणि आजही तो गोल्डन डकवर परतला. कर्णधार ऋतुराज गायकवाड व डॅरिल मिचेल यांनी भार सांभाळला होता, परंतु त्यांनाही पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. ऋतुराज व डॅरिल मिचेल यांनी ५७ धावांची भागीदारी करून संघाला ७ षटकांत १ बाद ६९ धावांपर्यंत पोहोचवले. स्ट्रॅटेजिक ब्रेकनंतर राहुल चहरने CSK ला सलग चेंडूंवर दोन धक्के दिले. ऋतुराज २१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३२ धावांवर झेलबाद झाला, तर शिवम शून्यावर माघारी परतला.
जडेजा २६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांवर माघारी परतला. चेन्नईला ९ बाद १६७ धावाच करता आल्या.