IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी पंजाब किंग्सवर विजय मिळवून प्ले ऑफच्या आशा जीवंत राखल्या आहेत. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा व तिलक वर्मा यांच्या फटकेबाजीने MI ने १९२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झी यांनी PBKS चे ४ फलंदाज १४ धावांवर माघारी पाठवून मोठं काम केलं. या धक्क्यानंतर पंजाबला शशांक सिंग व आशुतोष शर्मा या जोडीने पुनरागमन करून दिले होते. आशुतोषने MI चे धाबे दणाणून सोडले होते, परंतु त्याचा संघर्ष अयशस्वी ठरला आणि मुंबईने विजय मिळवला.
What a Ball! जसप्रीत बुमराहच्या यॉर्करने पंजाबच्या फलंदाजाचे उडवले तिन्ही त्रिफळे; Video
शिखर धवनच्या गैरहजेरीत पंजाबी सुरुवात पुन्हा एकदा निराशानजक झाली. कर्णधार सॅम कुरन ( ६) सलामीला आला, परंतु जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकात त्याची विकेट घेतली. दुसऱ्या बाजूने गेराल्ड कोएत्झीने PBKSच्या प्रभसिमरन सिंग ( ०) व लिएम लिव्हिंगस्टन ( १) यांच्या विकेट्स घेतल्या. जॉनी बेअरस्टोच्या जागी संधी मिळालेल्या रिली रोसूव (०) याचा भन्नाट यॉर्करवर बुमराहने त्रिफळा उडवला. पंजाबचे ४ फलंदाज १४ धावांत माघारी परतले. हरप्रीत भाटीया हा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आला आणि शशांक सिंगसह त्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंजाबने पॉवर प्लेमध्ये ४ बाद ४० धावा केल्या होत्या. पण, श्रेयस गोपाळने कॉट अँड बोल्ड करून हरप्रीतला ( १३) माघारी पाठवले.
कागिसो रबाडाने पहिलाच चेंडू स्क्वेअर लेगवरून षटकार खेचला. ६ चेंडूंत १२ धावा असा सामना आणला. त्यात मुंंबईला स्लो ओव्हर रेट पेनल्टी बसली आणि आता फक्त चार खेळाडू ३० यार्ड बाहेर उभे करता आले होते. कागिसो रबाडा ( ८) रन आऊट झाला आणि मुंबईने ९ धावांनी सामना जिंकला.
तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ३६) आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली फटकेबाजी केली. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ चेंडूंत ८१ धावा जोडल्या. रोहितच्या विकेटनंतर मुंबईच्या धावांची गती संथ करण्यात पंजाबच्या गोलंदाजांना यश आले. सूर्याने ५३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. हार्दिक पांड्या ( १०) अपयशी ठरला. तिलक वर्मा व टीम डेव्हिडने ( १४) चांगली फटकेबाजी करून मुंबईला ७ बाद १९२ धावांपर्यंत पोहोचवले. तिलक १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला. PBKS कडून हर्षल पटेलने ३, तर सॅम कुरनने २ विकेट्स घेतल्या.
IPL Point Table 2024मुंबई इंडियन्सचा ७ सामन्यांतील हा तिसरा विजय ठरला आणि त्यांनी ६ गुणांसह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्सशी बरोबरी केली. राजस्थान रॉयल्स १२ गुणांसह अव्वल स्थानी आहे. KKR, CSK व SRH यांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत.