IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : पंजाब किंग्सच्या मैदानावर रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकात इशान किशनची विकेट ( ८) पडल्यानंतर सूर्या व रोहितने मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. इशानची विकेट ही कागिसो रबाडाची ट्वेंटी-२०तील २५० वी विकेट ठरली. वन डाऊन आलेल्या सूर्यकुमार यादवने सलग दोन चौकार खेचून कागिसोची हवा काढली. रोहितने आयपीएलमध्ये ६५०० धावांचा पल्ला आज ओलांडला आणि असा पराक्रम करणारा तो चौथा फलंदाज ठरला. विराट कोहली ( ७६२४), शिखर धवन ( ६७६९) आणि डेव्हिड वॉर्नर ( ६५६३) हे रोहितच्या पुढे आहेत. सूर्याने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रोहितचा अफलातून षटकार पाहायला मिळाला.
रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी
हर्षल पटेलच्या स्लोव्हर चेंडूवर रोहितने एका हाताने मिड ऑनच्या दिशेने उत्तुंग फटका खेचला अन् तो सीमापार गेला. पण, पुढच्या षटकात सॅम करनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्याने २५ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. आयपीएलमध्ये प्रथमच सॅमने रोहितची विकेट मिळवली. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक २२४ षटकारांचा विक्रम रोहितने नावावर करताना किरॉन पोलार्डला ( २२३) मागे टाकले.