रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी

पंजाबच्या मैदानावर रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळतेय..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 08:21 PM2024-04-18T20:21:46+5:302024-04-18T20:22:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : Rohit Sharma completes 6500 runs in the IPL, Fifty by Suryakumar Yadav | रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी

रोहित शर्माची IPL मधील 'फनटास्टीक फोर' मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार यादवची फिफ्टी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : पंजाबच्या मैदानावर रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळतेय.. तिसऱ्या षटकात इशान किशनची विकेट पडल्यानंतर सूर्या व रोहितने अर्धशतकी भागीदारी करून मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. पंजाब किंग्सविरुद्धच्या या सामन्यात रोहितने फनटास्टीक फोरमध्ये एन्ट्री घेतली अन् सूर्यकुमार यादवनेही ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांना ६ पैकी केवळ २ सामने जिंकता आलेले आहेत. रोहित शर्माचा हा आयपीएलमधील २५० वा सामना आहे आणि महेंद्रसिंग धोनीनंतर आयपीएलमध्ये २५० सामने खेळणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघात जॉनी बेअरस्टोच्या जागी रिली रोसू खेळणार आहे, तर अथर्व तायडेला आज विश्रांती दिली गेली आहे. MI च्या संघात कोणताच बदल केला गेलेला नाही. हार्दिक पांड्याला प्रथम फलंदाजीच करायची होती आणि त्याचा मनासारखा निर्णय झाला. 


कागिसो रबाडाने तिसऱ्या षटकात MI ला धक्का दिला आणि इशान किशन ( ८) याचा हरप्रीत ब्रारने सुरेख झेल घेतला. कागिसोचा हा ट्वेंटी-२०तील २५० वा बळी ठरला. वन डाऊन आलेल्या सूर्यकुमार यादवने सलग दोन चौकार खेचून कागिसोची हवा काढली. पाचव्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रोहित शर्मासाठी अम्पायरने बाद निर्णय दिला होता, परंतु सूर्यकुमार यादवच्या सांगण्याने हिटमॅनने DRS घेतला अन् त्याला जीवदान मिळाले. सूर्या- रोहितने संघाला पॉवर प्लेमध्ये ५४ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी ३५ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. 
रोहित शर्माने आयपीएलमध्ये ६५०० धावांचा पल्ला आज ओलांडला आणि असा पराक्रम करणारा तो चौथा फलंदाज ठरला. विराट कोहली ( ७६२४), शिखर धवन ( ६७६९) आणि डेव्हिड वॉर्नर ( ६५६३) हे रोहितच्या पुढे आहेत. 
 


 

Web Title: IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : Rohit Sharma completes 6500 runs in the IPL, Fifty by Suryakumar Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.