रोहित शर्मा-शिखर धवन यांचा हातात हात अन् डान्स! दोन जिगरी मित्रांचा भारी Video 

रोहित शर्मा आणि शिखर धवन हे भारतीय क्रिकेटमधील दोन स्टार ओपनर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 07:25 PM2024-04-18T19:25:39+5:302024-04-18T19:27:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : Rohit Sharma dancing with Shikhar Dhawan, Cameraman focused on the toss results, Video  | रोहित शर्मा-शिखर धवन यांचा हातात हात अन् डान्स! दोन जिगरी मित्रांचा भारी Video 

रोहित शर्मा-शिखर धवन यांचा हातात हात अन् डान्स! दोन जिगरी मित्रांचा भारी Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : रोहित शर्मा आणि शिखर धवन हे भारतीय क्रिकेटमधील दोन स्टार ओपनर्स... या दोघांची मैत्री तितकीच घट्ट आहे आणि आज इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या निमित्ताने पंजाब किंग्समुंबई इंडियन्स लढतीपूर्वी दोन्ही जिगरी मित्रांची भेट झाली. रोहित व शिखर यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर हिटमॅनने गब्बरचा हात हाता घेतला व मस्त डान्सही केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांना ६ पैकी केवळ २ सामने जिंकता आलेले आहेत. रोहित शर्माचा हा आयपीएलमधील २५० वा सामना आहे आणि महेंद्रसिंग धोनीनंतर आयपीएलमध्ये २५० सामने खेळणारा तो दुसरा खेळाडू बनला आहे. पंजाब किंग्सकडून टॉससाठी पुन्हा सॅम कुरन आल्याने आजच्या सामन्यात शिखर धवन खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  पंजाबच्या संघात जॉनी बेअरस्टोच्या जागी रिली रोसू खेळणार आहे, तर अथर्व तायडेला आज विश्रांती दिली गेली आहे. MI च्या संघात कोणताच बदल केला गेलेला नाही.

Image
रोहित व शिखर यांनी वन डे क्रिकेटमध्ये सलामीला येऊन सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथे स्थान पटकावलेले आहे. या दोघांनी २०१३ ते २०२२ या कालावधीत ११५ सामन्यांत ५१४८ धावा जोडल्या आहेत. सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर ( ६६०९) यांच्यानंतर ही भारताकडून सर्वाधिक धावा करणारी दुसरी सलामीची जोडी आहे. 

या सामन्यात आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीत टॉस फिक्सिंगचा आरोप होत होता आणि त्यामुळे आजच्या लढतीत टॉस जमिनीवर आल्यावर कॅमेरामनने फोकस करून नेमकं चित्र प्रेक्षकांना दाखवलं. 

Web Title: IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians Live Marathi : Rohit Sharma dancing with Shikhar Dhawan, Cameraman focused on the toss results, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.