IPL 2024 Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live Marathi : मुल्लापूर येथील महाराज यादवेंद्रसिंग क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना रंगतोय. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने खेळून दोन विजय मिळवले आहेत. PBKS ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच चेंडूवर पंजाबला विकेट मिळाली असती, परंतु त्यांनी DRS ने घेण्याची चूक केली. मात्र, अर्शदीप सिंगने त्याच्या पहिल्या षटकात SRH ला दोन धक्के दिले.
पॅट कमिन्सने पंजाबचे फलंदाज शिखर धवन व जॉनी बेअरस्टो यांच्यावर वर्चस्व राखले आहे. त्याने या दोघांना प्रत्येकी २ वेळा बाद केले आहे. तेच धवनला आज पंजाबकडून १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम खुणावतोय. जयदेव उनाडकटविरुद्ध धवनची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने ४४ चेंडूंत ७० धावा चोपल्या आहेत आणि केवळ एकदा बाद झाला आहे. हैदराबादचा पंजाविरुद्ध जय-पराजयाचा रेकॉर्ड १४-७ असा आहे. कागिसो रबाडाने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडसाठी झेलबादची जोरदार अपील झाले. जितेश शर्मा व कर्णधार शिखर धवन यांनी अपील केले. पण, DRS घ्यायचा की नाही, यावर त्यांचे सहमत न झाले. मात्र, रिप्लेत हेडच्या बॅटचा चेंडूशी संपर्क झाल्याचे दिसल्यानंतर धवन प्रचंड निराश दिला. हैदराबादच्या हेडला पहिल्या चेंडूवर जीवदान मिळाले. त्यानंतर हेडने रबाडाच्या पुढच्या षटकात सलग ३ चौकार खेचले.
अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात पंजाब किंग्सला मोठी विकेट मिळवली. हेडने ( २१) खेचलेला मोठा फटका उत्तुंग उडाला आणि मिड ऑफला उभा असलेल्या धवनने पळत चांगला झेल घेतला. अर्शदीपने एक चेंडूच्या अंतराने एडन मार्करमला ( ०) बाद करून हैदराबादला २७ धावांवर दोन धक्के दिले. ट्वेंटी-२०त १५० विकेट्स घेणारा अर्शदीप हा भारताचा चौथा डावखुरा जलदगती गोलंदाज झाला. जयदेव उनाडकट ( २२१), इरफान पठाण ( १७३) व आशिष नेहरा ( १६२) हे आघाडीवर आहेत.
अभिषेक शर्मा ( १६) चांगल्या टचमध्ये दिसला, परंतु सॅम कुरनने त्याला गंडवले आणि माघारी पाठवले. अभिषेक हा हैदराबादकडून १००० धावा पूर्ण करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला.
Web Title: IPL 2024 Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live Marathi : A double-wicket over from Arshdeep Singh, A brilliant running catch from Shikhar Dhawan, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.