Join us  

सनरायझर्स हैदराबादने रोमहर्षक विजय मिळवला, पंजाब किंग्सने २ धावांनी गमावला सामना

सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये तिसऱ्या विजयाची नोंद करताना पंजाब एफसीला नमवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 11:12 PM

Open in App

IPL 2024 Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Live Marathi : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये तिसऱ्या विजयाची नोंद करताना पंजाब एफसीला नमवले. नितीश रेड्डीच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर SRH ने मोठी धावसंख्या उभारली. अर्शदीप सिंगच्या ४ विकेट्सची कामगिरी व्यर्थ गेली. त्यानंतर PBKS च्या आघाडीच्या फलंदाजांना आलेले अपयश SRH च्या पथ्यावर पडले. शशांक सिंग व आशुतोष शर्मा यांनी पुन्हा एकदा नेत्रदिपक फटकेबाजी करून पंजाबसाठी शेवटपर्यंत संघर्ष केला आणि त्यांना अवघ्या २ धावांनी हार मानावी लागली.  

पॅट कमिन्स व भुवनेश्वर कुमार यांनी पहिल्या दोन षटकांत अनुक्रमे जॉनी बेअरस्टो ( ०) व प्रभसिमरन सिंग ( ४) यांना माघारी पाठवले. भुवीच्या पुढच्या षटकात शिखर धवनला जीवदान मिळाले, परंतु दोन चेंडूनंतर हेनरिच क्लासेनने अप्रतिम स्टम्पिंग करून PBKS ला मोठा धक्का दिला. गब्बर १४ धावांवर माघारी परतला. सॅम कुरन ( २९) चांगली फटकेबाजी करत होता, परंतु टी नटराजनने त्याला बाद केले. शशांक सिंग व सिकंदर रझा यांनी चांगला खेळ सुरू ठेवला होता. पण, जयदेव उनाडकटच्या चेंडूवर स्कूप मारण्याच्या प्रयत्नात सिकंदर ( २८) क्लासेनच्या हाती झेल देऊन परतला.  

जितेश शर्माचे ( १९) अपयशाचे सत्र सुरूच राहिले आणि नितीश रेड्डीने त्याची विकेट मिळवली.  २४ चेंडूंत ६७ धावांचे आव्हान पंजाबसमोर होते आणि आशुतोष शर्मा व शशांक ही मागील सामन्यातील मॅच विनर जोडी मैदानावर होती. भुवीने ४-१-३२-२ अशी स्पेल संपवली. आशुतोष व शशांक यांनी पंजाबच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या आणि सामना १२ चेंडू ३९ असा जवळ आणला. टी नटराजनने १९व्या षटकात १० धावा दिल्याने पंजाबला ६ चेंडूंत २९ धावा करायच्या होत्या.

जयदेवच्या पहिल्या चेंडूवर आशुतोषने जबरदस्त फटका मारला, परंतु सीमारेषेवर हैदराबादच्या खेळाडूने झेल टाकला व चेंडू षटकार गेला. दोन वाईडनंतर दुसऱ्या चेंडूवर पंजाबला तसाच षटकार मिळाला. पुढच्या दोन चेंडूंवर प्रत्येकी २ धावा आल्याने २ चेंडू ११ धावा असा सामना अधिक रंगतदार झाला. पण, गोलंदाजने पुन्हा वाईड फेकला. पाचव्या चेंडूवर पुन्हा एक झेल सुटला. पंजाबला ६ बाद १८० धावा करता आल्याने हैदराबादने २ धावांनी सामना जिंकला. शशांक ४६ ( २५ चेंडू) व आशुतोष ३३ ( १५) धावांवर नाबाद राहिले. 

 

तत्पूर्वी, SRH चे स्टार फलंदाज आज PBKS च्या गोलंदाजी समोर ढेपाळले.  २० वर्षीय फलंदाज नितीश कुमार रेड्डी  ( चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ६४ धावा ) याने अब्दुल समदसह ( २५) २० चेंडूंत ५० धावा जोडून SRH ला सामन्यात पुन्हा आणले. हैदराबादने ९ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला. अर्शदीप सिंगने २९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. सॅम कुरन व हर्षल पटेल यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.  

 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्स