Join us  

IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस

SRH vs GT सामना रद्द झाल्याने नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 11:02 PM

Open in App

IPL 2024, QUALIFIER 1 Scenario :  सनरायझर्स हैदराबाद हा इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला. गुजरात टायटन्सविरुद्धचा घरच्या मैदानावरील सामना पावसामुळे वाया गेल्याने SRH-GT ला प्रत्येकी १ गुण दिला गेला. यामुळे १३ सामन्यांत १५ गुणांसह हैदराबादने प्ले ऑफची जागा पक्की केली. पण, त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सच्या आशांना सुरुंग लागला आहे. आता चौथ्या जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( CSK vs RCB) यांच्यात थेट लढत रंगणार आहे. 

मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स यांचे आव्हान संपले आहे. LSG चे १३ सामन्यांत १२ गुण आहेत आणि RCB चेही १३ सामन्यांत १२ गुण आहेत. पण, लखनौचा नेट रन रेट हा -०.७८७ इतका आहे आणि तो सुधारून CSK ( ०.५२८) पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा चमत्कारच करावा लागेल. तेच RCB चा नेट रन रेट ०.३८७ इतका आहे आणि त्यांचा शेवटचा साखळी सामना हा चेन्नईविरुद्धच आहे. CSK  १३ सामन्यांत १४ गुणांसह आघाडीवर आहेत, परंतु RCB त्यांना पराभूत करून प्ले ऑफचे चौथे तिकीट जिंकू शकतात...

SRH vs GT सामना रद्द झाल्याने नेमकं काय झालं?

  • सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफसाठी पात्र ठरले आणि दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेबाहेर फेकले गेले. 
  • सनरायझर्स हैदराबादला क्वालिफायर १च्या दुसऱ्या स्थानावर दावा सांगायचा असेल तर त्यांना पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल आणि त्याचवेळी KKR ने RR चा पराभव करावा याची वाट पाहावी लागेल. ( दोन्ही सामने रविवारी आहेत) 
  • RCB ने शेवटच्या साखळी सामन्यात १८ धावांनी किंवा १८.१ षटकांत विजय मिळवल्यास ते प्ले ऑफसाठी पात्र ठरतील ( प्रथम फलंदीज करताना २०० धावा झाल्याचे गृहित धरल्यास)
  • CSK ने शेवटच्या साखळी सामन्यात RCB चा पराभव केला आणि RR व SRH आपापले सामने हरल्यास ऋतुराज गायकवाडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर दावा सांगेल
  • राजस्थान रॉयल्सने KKR ला पराभूत केल्यात ते क्वालिफायर १ मध्ये खेळतील.  

 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सकोलकाता नाईट रायडर्सचेन्नई सुपर किंग्स