Join us  

रियान पराग, संजू सॅमसन यांची वादळी फटकेबाजी; गुजरात टायटन्सची पार धुलाई केली

गुजरातच्या खेळाडूंनी ३-४ झेल टाकले आणि त्यामुळे राजस्थानला डोकं वर काढता आले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 9:23 PM

Open in App

IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : संजू सॅमसन व रियान पराग यांनी  राजस्थान रॉयल्सला मजबूत धावसंख्या उभारून दिली. यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर यांना अनुक्रमे उमेश यादव व राशिद खान यांनी माघारी पाठवून गुजरात टायटन्सला पकड मिळवून दिली होती. पण,  संजू व रियान यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३० धावा जोडल्या. गुजरातच्या खेळाडूंनी ३-४ झेल टाकले आणि त्यामुळे राजस्थानला डोकं वर काढता आले. 

शुबमन गिलला राग अनावर, अम्पायरसोबत घातला वाद; BCCI करणार कारवाई?

यशस्वी जैस्वाल ( २४) आणि जॉस बटलर ( ८) स्वस्तात बाद झाल्याने RR अडचणीत सापडला होता. पण, कर्णधार संजू सॅमसन व रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७८ चेंडूंत १३० धावांची भागीदारी केली. या दोघांनी गुजरातच्या गोलंदाजांचा पार कचरा केला. परागने तुफान फटकेबाजीने स्टेडियम दणाणून सोडले. रियानने ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले. रियान गुजरातच्या गोलंदाजांना जुमानत नव्हता आणि त्याच्या फटकेबाजीने संजूसह शतकी भागीदारी पूर्ण केली. १९व्या षटकांत विजय शंकरने सीमारेषेवर सुरेख झेल घेऊन परागची विकेट मिळवली. परागने ४८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७६ धावा चोपल्या.  

शिमरोन हेटमायरने ( १३ धावा व  ५ चेंडू) पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी सुरू केली. संजू २०व्या षटकात जोरदार फटके खेचताना दिसला आणि त्याच्या खेळीमुळे राजस्थानने ३ बाद १९६ धावा उभ्या केल्या. संजू ३८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४संजू सॅमसनराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्स