IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : राजस्थान रॉयल्सने धावांचा डोंगर उभारल्यानंतर तो सर करण्यासाठी गुजरात टायटन्सकडूनही तसाच खेळ अपेक्षित होता. पावसाच्या व्यत्ययामुळे उशीराने सुरू झालेल्या सामन्यात निसरड्या मैदानाचा फायदा उचलताना RR ने चांगली फटकेबाजी केली. पण, GT कडून साई सुदर्शन व शुबमन गिल यांना मैदानावर उभं राहूनही धावांची अपेक्षित गती राखता आली नाही. DLS नुसार गुजरातचे १० षटकांत ८४ धावा होणे अपेक्षित होते, परंतु त्यांच्या १ बाद ७७ धावा झाल्या होत्या. त्यामुळे जेव्हा पाऊस पुन्हा सुरू झाला, तेव्हा त्यांची धडधड वाढलेली.
शुबमन गिलला राग अनावर, अम्पायरसोबत घातला वाद; BCCI करणार कारवाई?
यशस्वी जैस्वाल ( २४) आणि जॉस बटलर ( ८) स्वस्तात बाद झाले. कर्णधार संजू सॅमसन व रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७८ चेंडूंत १३० धावांची भागीदारी करून संघाला सावरले. परागने ४८ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७६ धावा चोपल्या. शिमरोन हेटमायरने ( १३ धावा व ५ चेंडू) पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी सुरू केली. संजू २०व्या षटकात जोरदार फटके खेचताना दिसला आणि त्याच्या खेळीमुळे राजस्थानने ३ बाद १९६ धावा उभ्या केल्या. संजू ३८ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांवर नाबाद राहिला. प्रत्युत्तरात शुबमन गिल व साई सुदर्शन यांनी GT ला आश्वासक सुरुवात करून दिली. गिलने १९वी धाव घाताच ट्वेंटी-२०त ४००० धावांचा टप्पा ओलांडला. शुबमन व साई यांनी ७ षटकांत अर्धशतकी धावा फलकावर चढवल्या.
आठव्या षटकात युझवेंद्र चहलने स्वतःच्याच गोलंदाजीवर साईचा सोपा झेल टाकला. कुलदीप सेनने त्याच्या पहिल्या व सामन्यातील ९व्या षटकात पहिला धक्का दिला. साई २९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३५ धावांवर पायचीत झाला. शुबमन मैदानावर उभा राहिला आणि त्याने मोठा पराक्रम केला. आयपीएलमध्ये ३००० धावा करणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने २४ वर्ष व २१५ दिवसांचा असताना हा टप्पा ओलांडून विराट कोहली ( 26yrs 186d), संजू सॅमसन ( 26yrs 320d), सुरेश रैना ( 27yrs 161d) व रोहित शर्मा ( 27yrs 343d ) यांचा विक्रम मोडला.
IPL मध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये ३००० धावा करणारे भारतीय फलंदाज
८० - लोकेश राहुल
९४- शुबमन गिल
१०३ - सुरेश रैना
१०४- अजिंक्य रहाणे
१०९ - रोहित शर्मा व शिखर धवन
११० - विराट कोहली व गौतम गंभीर
IPL मध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये ३००० धावा करणारे फलंदाज
७५ - ख्रिस गेल
८० - लोकेश राहुल
८५ - जॉस बटलर
९४- डेव्हिड वॉर्नर/फॅफ ड्यू प्लेसिस/शुबमन गिल
Web Title: IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : Shubman Gill became a Youngest player to reach 3000 ipl runs, check all 3 records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.