Join us  

यशस्वी जैस्वाल हे काय केलंस! चांगला खेळत होता अन्...; उमेश यादवसाठी ठरली विक्रमी विकेट, Video

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये अपराजित राजस्थान रॉयल्सला रोखण्यासाठी गुजरात टायटन्सने कंबर कसली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 8:34 PM

Open in App

IPL 2024 : Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये अपराजित राजस्थान रॉयल्सला रोखण्यासाठी गुजरात टायटन्सने कंबर कसली आहे. जयपूरमध्ये अचानक पाऊस सुरू झाल्याने खेळपट्टी कव्हर केली गेली होती आणि त्यामुळे टॉस ७ ऐवजी ७.२५ ला झाला आणि सामना ७.४० ला सुरू झाला. शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केन विलियम्सन आणि शरथ यांच्या जागी मॅथ्यू वेड व अभिनव मनोहर हे दोन बदल गुजरातच्या संघात पाहायला मिळत आहेत. कर्णधार म्हणून संजू सॅमसनचा हा पन्नासावा सामना आहे, तर युझवेंद्र चहल १५० वा आयपीएल सामना आज खेळतोय. 

यशस्वी जैस्वालने RR ला सकारात्मक सुरूवात करून दिली. त्याने आयपीएलमध्ये २०० चौकारांचा टप्पा आज ओलांडला आणि त्याने  प्रती ४.१ चेंडूनंतर चौकार खेचले आहेत, सुनील नरीन, आंद्रे रसेल व वीरेंद्र सेहवाग यांची चौकारांची सरासरी ही जैस्वालपेक्षा चांगली आहे. पण, यशस्वीला ( २४) फार काळ GT च्या गोलंदाजांनी टिकू दिले नाही. उमेश यादवच्या चेंडूवर स्कूप मारण्याच्या प्रयत्नात यशस्वी यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेल देऊन परतला.

उमेश यादव हा ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०० विकेट घेणारा भारताचा पाचवा जलदगती गोलंदाज बनला. भुवनेश्वर कुमार  (२९१), जसप्रीत बुमराह ( २६५), जयदेव उनाडकट ( २२२) व हर्षल पटेल ( २१५) यांनी हा पराक्रम केला आहे. राशिद खानने त्याच्या पहिल्या षटकात जॉस बटलरला ( ८)  माघारी पाठवून RR ला मोठा धक्का दिला. संजूला दोन जीवदान मिळाले आणि रियान परागसह त्याने GT चे बारा वाजवले.  

 

 

टॅग्स :आयपीएल २०२४यशस्वी जैस्वालराजस्थान रॉयल्सगुजरात टायटन्स