IPL 2024 , Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Marathi : सलग तीन सामने गमावल्यानंतर, मुंबई इंडियन्सने त्यांच्या पुढील चार सामन्यांमध्ये तीन विजयांसह बाउन्स बॅक केले. सोमवारी जयपूरमध्ये ते राजस्थान रॉयल्सचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. २०१२ पासून MI ला जयपूरमध्ये RR वर विजय मिळवता आलेला नाही. संजू सॅमसन (२७६ धावा), रियान पराग ( ३१८) आणि जॉस बटलर ( २५०) यांच्या ८४४ धावांच्या योगदानाच्या जोरावर RR ला गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थानी बसवले आहे. या तगड्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान MI च्या गोलंदाजांना पेलावे लागणार आहे. मुंबई इंडियन्स सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.
या आयपीएलमध्ये यशस्वी जैस्वाल पॉवर प्लेमध्ये सातपैकी सहा वेळा बाद झाला आहे आणि ही RR साठी चिंतेची बाब आहे. IPL 2024 मध्ये बुमराह आणि कोएत्झी यांनी मिळून आतापर्यंत एकूण २५ विकेट घेतल्या आहेत. रियान परागने सात डावात 20 षटकार मारले आहेत, जे रॉयल्सच्या फलंदाजासाठी सर्वाधिक आहे . युझवेंद्र चहलने सात सामन्यांमध्ये प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. जयपूरमध्ये त्याने आतापर्यंत चार सामन्यांत सात विकेट्स घेतल्या आहेत.
- हार्दिक पांड्याचा हा मुंबई इंडियन्सकडून १००वा आयपीएल सामना आहे.
- युझवेंद्र चहलला आयपीएलमध्ये दोनशे विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ बळी हवा आहे
- ट्रेंट बोल्टला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी दोन बळी हवे आहेत
- इशान किशनने तीन झेल घेतल्यास तो ट्वेंटी-२०त १०० झेल पूर्ण करेल
- संजू सॅमसनला आयपीएलमध्ये २०० षटकारांचा पल्ला गाठण्यासाठी ७ उत्तुंग फटके मारावे लागतील
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आकाश मढवाल, रोमारियो शेफर्ड व श्रेयस गोपाळ यांना आज प्लेइंग इलेव्हनमधून विश्रांती दिली गेली आहे. यांच्याजागी नुवान तुशारा, नेहाल वधेरा व पियुष चावला यांना संधी मिळाली आहे. नुवानचे पदार्पण होत आहे आणि त्याची गोलंदाजी शैली ही लसिथ मलिंगासारखी आहे.