IPL 2024 , Rajasthan Royals vs Mumbai Indians Live Marathi : आयपीएल २०२४ मध्ये तिलक वर्मा व नेहाल या युवा डावखुऱ्या फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी करताना MI ला ९ बाद १७९ धावांवर पोहोचवले. राजस्थानच्या संदीप शर्माने जबरदस्त पुनरागमन करताना पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर यांनी दमदार सुरुवात करून दिली, परंतु पावसाने खोडा घातला.
तिलक वर्माने मोडला सुरेश रैनाचा विक्रम; नेहालसह MS Dhoniलाही मागे टाकले, ६ विक्रम नोंदवले
ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले. इशान किशन ( ०) आणि सूर्यकुमार यादव ( १०) यांना संदीप शर्माने बाद केले. मोहम्मद नबीला ( २३) कॉट अँड बोल्ड करून युझवेंद्र चहलने इतिहास घडवला. आणि आयपीएल इतिहासात २०० विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. तिलक वर्मा व नेहाल यांनी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडल्या. नेहाल २४ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४९ धावांवर बाद झाला. तिलकने ४५ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६५ धावा केल्या. तिलक व नेहाल यांनी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडल्या. संदीप शर्माने २०व्या षटकात तीन विकेट्स घेताना डावात १८ धावांत ५ विकेट्स पूर्ण केल्या.
Impact player जॉस बटलर व यशस्वी जैस्वाल यांनी RR ला सकारात्मक सुरुवात करून दिली. फॉर्मात नसलेल्या यशस्वीला सूर गवसलेला दिसला. बटलर व जैस्वाल यांनी पॉवर प्लेमध्ये ६१ धावा उभ्या केल्या. कमकुवत गोलंदाजी ही MI साठी पुन्हा डोकेदुखी ठरताना दिसली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवला गेला अन् जर पुढे मॅच न झाल्यास RR विजयी ठरणार, कारण ते डकवर्थ लुईस नियमानुसार २० धावांनी पुढे आहेत.