युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला 

 RR ने घरच्या मैदानावरही वर्चस्व गाजवले. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 08:20 PM2024-04-22T20:20:13+5:302024-04-22T20:20:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : YUZVENDRA CHAHAL BECOMES THE FIRST BOWLER TO TAKE 200 IPL WICKETS | युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला 

युझवेंद्र चहलने मोठा पराक्रम केला! आयपीएल इतिहासात जो कुणालाच नव्हता जमला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये युझवेंद्र चहलने ( YUZVENDRA CHAHAL ) मोठ्या पराक्रमाची नोंद केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात यजमान राजस्थान रॉयल्सने वर्चस्व गाजवलेलं दिसतंय. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात रोहित शर्माची विकेट मिळवून दिल्यानंतर संदीप शर्माने दोन विकेट्स पटकावल्या. त्यात युझवेंद्रने फिरकीवर मोठी विकेट घेऊन इतिहास रचला. 

रोहित शर्माला अति घाई महागात पडली! इशान किशन, सूर्यकुमार यांनाही तंबूत जाण्याची घाई झाली 


वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी यजमान मुंबई इंडियन्सची अवस्था ४ बाद २० अशी केली होती आणि नंतर तो सामना सहज जिंकलाही होता. आता  RR ने घरच्या मैदानावरही वर्चस्व गाजवले. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माला ( ६) माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर MI च्या आशा होत्या आणि सूर्याने नेहमीप्रेमाणे काही अनपेक्षित फटके खेचले. संदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात सूर्यकुमारला ( १०)  माघारी पाठवून मुंबईची अवस्था ३ बाद २० धावा अशी केली. हार्दिक पांड्या फलंदाजीला येणे अपेक्षित असताना MI ने मोहम्मद नबीला पाठवले. नबीने सहाव्या षटकात आवेश खानचे २,६,४,४,१ असे स्वागत केले. त्यामुळे मुंबईला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ४५ धावा करता आल्या.


कर्णधार संजू सॅमसनने आर अश्विन व युझवेंद्र चहल हा फिरकी मारा सुरू केला आणि RR ला यश मिळाले. युझवेंद्रने त्याच्या पहिल्या षटकात नबीला ( २३) कॉट अँड बोल्ड केले आणि आयपीएलमधील ही त्याची २०० वी विकेट ठरली. आयपीएल इतिहासात २०० विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. त्यानंतर ड्वेन ब्राव्हो ( १८३) व पियुष चावला ( १८१) असा क्रम येतो. 

Web Title: IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : YUZVENDRA CHAHAL BECOMES THE FIRST BOWLER TO TAKE 200 IPL WICKETS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.