Join us  

विराट कोहलीचा भीमपराक्रम; IPL मधील असा विक्रम ज्याच्या आसपास कुणीच नाही अन्... 

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 8:09 PM

Open in App

IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले. RCB ला जेतेपदाचा दुष्काळ संपवायचा असेल तर लवकर लैय शोधणे गरजेची आहे. आज जयपूरमध्ये त्यांच्यासमोर सलग तीन सामने जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ पैकी १ मॅच जिंकली आहे आणि त्यांच्यासाठी आता पुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. विराट कोहलीचा फॉर्म हा त्यांच्यासाठी प्लस पॉईंट असला तरी अन्य खेळाडूंना अद्याप सूर गवसलेला नाही. 

ग्राऊंड्समनचा मुलगा, स्टेडियमच्या शेजारी तंबूत राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाचे RCBकडून पदार्पण

मागील पर्वात RCB ने राजस्थानविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले होते. जयपूर हे विराटसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने दमदार राहिले असले तरी आयपीएलच्या ८ इनिंग्जमध्ये त्याला इथे २१.२८च्या सरासरीनेच धावा करता आलेल्या आहेत. त्यात फॅफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल व कॅमेरून ग्रीन यांनी मिळून यंदाच्या पर्वात १३.२५च्या सरसरीने १५९ धावाच केल्या आहेत. त्यामुळे त्यांची चिंता वाढू शकते. RR आज संदीप शर्माला मैदानावर उतरवू शकत होते, परंतु तो दुखापतीमुळे याही सामन्याला मुकला. त्याने  १५ आयपीएल सामन्यांत विराटला ७ वेळा बाद केले आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले.विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCB ला पॉवर प्लेत ५३ धावा उभारून दिल्या. विराटने आक्रमक फटकेबाजी केली, तेच फॅफ संयमी खेळ करताना दिसला. या पर्वात पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावूनही ६० पेक्षा कमी धावा करणारा RCB हा पहिलाच संघ ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३०+ धावा करणाऱ्या फलंदाजांत विराटने आज किरॉन पोलार्डचा ( १७१) विक्रम मोडला.  आयपीएलमध्ये सर्वाधिक ७५०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याच्यानंतर शिखर धवनच्या ६७५५ धावा आहेत.  डेव्हिड वॉर्नर ( ६५४५), रोहित शर्मा ( ६२८०), सुरेश रैना ( ५५२८) यांचा क्रमांक नंतर येतो.  

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरराजस्थान रॉयल्सविराट कोहली