IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : विराट कोहली ( Virat Kohli) व फॅफ ड्यू प्लेसि यांच्या १२५ धावांच्या सलामीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दमदार सुरुवात करून दिली. युझवेंद्र चहलने RR ला विकेट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु एकाच षटकात विराट व फॅफचे झेल टाकले गेल्याने RCB ला मोठा दिलासा मिळाला. विराटने ६७ चेंडूंत आयपीएलमधील ८वे शतक झळकावले.
विराट कोहलीचा भीमपराक्रम; IPL मधील असा विक्रम ज्याच्या आसपास कुणीच नाही अन्...
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीला बोलावले. विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी RCB ला पॉवर प्लेत ५३ धावा उभारून दिल्या. विराटने आक्रमक फटकेबाजी केली, तेच फॅफ संयमी खेळ करताना दिसला. आयपीएलमध्ये सर्वाधिक ७५०० धावा करणारा विराट पहिला फलंदाज ठरला. त्याच्यानंतर शिखर धवनच्या ६७५५ धावा आहेत. डेव्हिड वॉर्नर ( ६५४५), रोहित शर्मा ( ६२८०), सुरेश रैना ( ५५२८) यांचा क्रमांक नंतर येतो. फॅफनेही हळुहळू हात मोकळे केले आणि संघाला पहिल्या १० षटकांत बिनबाद ८८ धावांपर्यंत पोहोचवले.
चहलने सामन्यातील दुसरी विकेट घेताना पदार्पणवीर सौरव चौहानला ( ९) बाद केले. पण, विराटने पुढच्या चेंडूवर चहलचे षटकाराने स्वागत केले. विराटने ६७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने आयपीएलमधील आठवे शतक झळकावले.