Join us  

RR vs RCB : राजस्थान रॉयल्सचं 'Pink Promise' काय आहे? अभिमान वाटेल अशी संकल्पना

IPL 2024 मधील राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये होणारा सामना खास असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 3:59 PM

Open in App

IPL 2024 मधील राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये होणारा सामना खास असणार आहे. रॉयल्सचा संघ या सामन्यात गुलाबी जर्सी घालून खेळणार आहे. इतर आयपीएल फ्रँचायझींच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न राजस्थान रॉयल्सने केला आहे. यापूर्वी RCB ने हिरवी जर्सी परिधान करून पर्यावरण जागृतीचा प्रचार केला आहे, तर गुजरात टायटन्सने IPL 2023 दरम्यान त्यांच्या लॅव्हेंडर जर्सीसह कर्करोगाविषयी जागरुकता वाढवली आहे. मुंबई इंडियन्सने त्याच वर्षी महिला संघासोबत एकता दाखवली.

राजस्थान रॉयल्सच्या #PinkPromise उपक्रमाचा एक भाग उद्या मैदानावर दिसणार आहे. ज्याचा उद्देश ग्रामीण राजस्थानमधील सशक्त महिलांना पाठिंबा देणे आहे आणि जे महत्त्वपूर्ण सामाजिक बदल घडवून आणत आहेत. RR विरुद्ध RCB चकमकीसाठी खरेदी करण्यात आलेल्या प्रत्येक तिकिटातील १०० रुपये हे  राजस्थानमधील महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण परिवर्तन उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी असतील. शिवाय, प्रत्येक गुलाबी रॉयल्स जर्सीच्या विक्रीतून मिळणारी रक्कम "द रॉयल राजस्थान फाऊंडेशन" च्या सामाजिक समता प्रयत्नांसाठी जाईल. या सामन्यादरम्यान प्रत्येक षटकारासाठी रॉयल्स आणि रॉयल राजस्थान फाऊंडेशनच्या सौजन्याने सांभर प्रदेशातील सहा घरांना सौर उर्जेने प्रकाशमान केले जाईल. 

राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत अपराजित मालिका कायम राखली आहे. त्यांनी लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांना पराभूत करून गुणतालिकेत शीर्षस्थान मिळवले आहे. याउलट, आरसीबीला तीन पराभव आणि फक्त एक विजय मिळवता आला आहे.   

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर