Join us  

IPL 2024: RCBचं चाललंय काय... संघ निवडताना नुसता गोंधळ, 'त्या' निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित

RCB confusion in Playing XI: IPL 2024 संघ व्यवस्थापनाने केलेल्या विचित्र अशा प्लेईंग ११ च्या गोंधळामुळे RCBवर प्रचंड टीका केली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 9:39 AM

Open in App

RCB confusion in Playing XI: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची पराभवाची मालिका काही केल्या संपेना. सनरायजर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात RCBला २५ धावांनी पराभवाचा स्वीकारावा लागला. RCBने टॉस जिंकून प्रथम हैदराबादला फलंदाजी करण्यास सांगितले. SRHने तुफान खेळी करत IPL इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या उभारली. त्यांनी २० षटकांत ३ बाद २८७ धावा केल्या. त्यांनी त्यांचाच मुंबईविरूद्ध केलेला २७७ धावांचा विक्रम मोडला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूनेही चांगली झुंज दिली. त्यांनी २० षटकांत ७ बाद २६२ धावा केल्या. पण तरीही अखेर बंगळुरूच्या पदरी निराशाच आली. त्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांनी ७ पैकी तब्बल ६ सामने हरले. त्यामुळे आता त्यांची प्लेऑफची वाट अधिकच बिकट झाली आहे. SRHविरूद्धही RCBने घेतलेल्या निर्णयावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रथम गोलंदाजी आणि फक्त ५ गोलंदाज

बंगळुरूच्या संघाची मांडणी आतापर्यंत ठीकठाक होती असे म्हणावे लागेल. कारण SRHच्या विरूद्ध सामन्यात प्लेइंग इलेव्हन निवडायची वेळ आली, तेव्हा बेंगळुरूने सर्वांनाच चकित केले. त्यांनी आपला मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळले. सिराजच्या अलीकडच्या कामगिरीचा विचार करता, या निर्णयामुळे आश्चर्य वाटेल पण खरा मुद्दा वेगळाच आहे. बंगळुरूने केवळ ४ वेगवान गोलंदाज आणि एक पार्ट टाइम फिरकीपटू विल जॅकचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला होता. म्हणजे एकूण ५ गोलंदाज. जेव्हा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो तेव्हा संघाला अधिक गोलंदाजी पर्यायांची आवश्यकता असते. पण बंगळुरूने सगळाच गोंधळ करून ठेवला.

'इम्पॅक्ट प्लेयर'चा घोळ

याशिवाय आणखी एक बाब म्हणजे, RCB च्या थिंक टँकने इम्पॅक्ट प्लेयर लिस्टमध्ये घोळ घातला. प्रथम गोलंदाजी करताना बंगळुरूला प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिक गोलंदाजांची गरज होती परंतु त्यांनी इम्पॅक्ट खेळाडूंमध्ये ३ गोलंदाज ठेवले होते. यामध्ये मोहम्मद सिराजचाही समावेश होता. त्यामुळे संपूर्ण गोंधळ दिसून आला.

असा गोंधळ पहिल्यांदाच दिसला नाही. याआधीही, एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिक गोलंदाजांचा समावेश केला होता, तर इम्पॅक्ट खेळाडूंच्या यादीत अधिक फलंदाज होते.

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद