IPL 2024 KKR vs RCB, Playing XI कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सध्या गुणतालिकेत KKRचा संघ खूपच चांगल्या स्थितीत आहे. त्यांनी ६ पैकी ४ सामन्यात विजय मिळवला असून ते ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. तर RCB ७ पैकी केवळ १ सामना जिंकून गुणतक्त्यात तळाशी आहेत. बंगळुरूच्या संघाने स्पर्धेतील सर्वात पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर ते सलग ६ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी संघात तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. बंगळुरूच्या संघात मोहम्मद सिराज, कॅमेरॉन ग्रीन आणि करण शर्मा या तिघांना स्थान देण्यात आले आहे. कोलकाताच्या संघाने मात्र कोणताही बदल केलेला नाही.
कोलकाताचा संघ- फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा
इम्पॅक्ट खेळाडू- सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज
बंगळुरूचा संघ-विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल
इम्पॅक्ट खेळाडू- सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, वैज्ञानिक विजयकुमार, स्वप्नील सिंग