IPL 2024 CSK vs RCB Match : २२ मार्चला आयपीएलच्या १७ व्या हंगामाला सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी या दोन संघांमध्ये कमालीचा रंजक सामना पाहायला मिळाला. या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात नवखा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. गतविजेच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या सतराव्या हंगामात बंगळुरुला पहिल्या सामन्यात सहा गडी राखून पराभूत केलं. ह्या सामन्यात आरसीबीने २० षटकांत सहा बाद १७३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यावर प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने हा सामना केवळ चार गड्यांच्या मोबदल्यात १८.४ षटकात जिंकला. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल याने टिपलेला झेल चर्चेचा विषय ठरला.
या सामन्यात अजिंक्य रहाणेला १९ चेंडूत फक्त २७ धावा करता आल्या. आरसीबीचा वेगवान गोलंदाज कॅमेरोन ग्रीन ११ व्या षटकांत गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. दरम्यान, त्याने शॉर्ट पीच लेंग्थवर चेंडू टाकला, त्या चेंडूवर हा फूल शॉट आणि चेडू हवेत मारला. या संधीचा पूरेपूर फायदा घेत ग्लेन मॅक्सवेलने हवेत उडी मारली. सीमारेषेच्या दिशेने चेंडू कूच करत असताना त्याने झेल टिपला अन् रहाणेला माघारी पाठवलं.
दरम्यान, या सामन्यात प्रथम नोणेफेक जिंकून आरसीबीच्या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात २० षटकांमध्ये आरसाबीला केवळ १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. डू प्लेसिसने ३५ धावांची खेळी खेळली पण विराट कोहली २१ धावा करून माघारी परतला. मॅक्सवेलला या सामन्यात आपलं खातं उघडता आलं नाही. या सामन्यात ग्रीनने केवळ १८ धावा करता आल्या. अनुज रावत या खेळाडूने २६ चेंडूत ४८ धावांची शानदार खेळी केली. तर दिनेश कार्तिकने नाबाद ३८ धावा केल्या. दोन्ही खेळाडूंनी ९५ धावांची भागीदारी करत मजबूत धावसंख्या केली.
चेन्नई सुपर किंग्जकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर आरसीबीने दिलेले १७४ धावांचे लक्ष्य चेन्नईच्या संघाने अवघ्या १८.४ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केल्याचं पाहायला मिळालं. राचिन रवींद्रने सर्वाधिक ३७ धावांची, तर शिवम दुबेने ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सलामी सामन्यात रवींद्र जडेजा २५ धावा करून नाबाद परतला. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा दोघांमध्ये ३७ चेंडूत ६६ धावांची नाबाद भागीदारी झाली. फलंदाज दुबेने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा करत यशस्वी खेळी केली. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी चेन्नईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Web Title: ipl 2024 rcb player glenn maxwell took catch of csk ajinkya rahane in ma chidambaram stadium video goes viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.