IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात काही खास झाली नाही. फिरकीला पोषक खेळपट्टीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ग्लेन मॅक्सवेलला पहिले षटक दिले. त्याने पहिल्याच चेंडूवर CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला माघारी पाठवले. ऋतुच्या विकेटनंतर स्टेडियमव दणाणून गेले आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही जोरदार सेलिब्रेशन करताना दिसली. बाजूलाच असलेली श्रेयांका पाटीलही प्रचंड खूश झाली.
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला
प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी RCB ने मोठी धावसंख्या उभी केली. विराट कोहली ( ४७) व फॅफ ड्यू प्लेसिस ( ५४) यांनी पहिल्या विकेटसाठी ७८ धावा चोपल्या. पण, CSK चे फिरकीपटू मिचेल सँटनर ( १-२३) व महिशा तीक्षणा ( ०-२४) यांनी सुरेख मारा करून मधल्या षटकांत धावांची गती संथ केली होती. पण, कॅमेरून ग्रीन व रजत पाटीदार यांनी २८ चेंडूंत ७१ धावा चोपून RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिला. पाटीदार २३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावांवर झेलबाद झाला. दिनेश कार्तिक ( ६ चेंडूंत १४ धावा ) आणि ग्लेन मॅक्सवेल ( ५ चेंडूंत १६ धावा) यांनी झटपट धावा केल्या. ग्रीन १७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला आणि बंगळुरूने ५ बाद २१८ धावा केल्या.