Join us  

विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

प्ले ऑफची चौथी जागा पक्की करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या RCB ने आक्रमक सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 8:58 PM

Open in App

IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : प्ले ऑफची चौथी जागा पक्की करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या RCB ने आक्रमक सुरुवात केली. CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजाची सावध सामना केल्यानंतर दुसऱ्या षटकानंतर विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी गिअर बदलला. शार्दूल ठाकूरच्या पहिल्या षटकात दोघांनी १६ धावा चोपल्या. त्यानंतर विराटने तिसऱ्या षटकात तुषारच्या गोलंदाजीवर दोन खणखणीत षटकार खेचले. एक चेंडू स्टेडियमच्या छतावर आदळला, तर दुसरा स्टँडच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. ३ षटकांत ३१ धावा चोपल्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि मॅच थांबली होती. प्ले ऑफची जागा पक्की करण्यासाठी आजची मॅच होणे RCB साठी खूप महत्त्वाची आहे.    

८.२५ वाजता सामना पुन्हा सुरू झाला आणि CSK ने फिरकीपटू महिशा तीक्षणा याला गोलंदाजीला आणले. त्याने ४ धावाच दिल्या. पावसानंतर खेळपट्टी फिरकीला चांगली साथ देताना दिसली आणि मिचेल सँटनरने पाचव्या षटकात RCB च्या ओपनर्सना हैराण केले. त्यानेही २ धावाच दिल्या. पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात फॅफने चौकार खेचला खरा, परंतु तीक्षणाच्या त्या षटकात फक्त ५ धावा आल्या. पहिल्या सहा षटकांत RCB ला ४२ धावा जोडता आल्या. वेगाने वळणारे चेंडू पाहून विराटही स्तब्ध झालेला दिसला. तरीही त्याने अधूनमधून चांगले फटके खेचले. विराट २९ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांवर बाद झाला. मिचेल सँटरनच्या गोलंदाजीवर डॅरिल मिचेलने सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला.  

भारतात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ९००० धावा करणारा विराट हा पहिला फलंदाज ठरला. त्यानंतर रोहित शर्माचा ( ८००८) क्रमांक येतो.  यंदाच्या पर्वात विराटने ७००+ धावा केल्या आणि आयपीएलच्या दोन पर्वात इतक्या धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. विराटने २०१६ मध्ये ९७३ धावा केल्या होत्या. ख्रिस गेलने २०१२ व २०१३ मध्ये ७०० हून अधिक धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्सख्रिस गेल