Join us  

विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात एक असा प्रसंग घडला, ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 8:15 PM

Open in App

IPL 2024, RCB vs DC Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात एक असा प्रसंग घडला, ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे. RCB आणि DC या दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये धडक देण्याची अजूनही संधी आहे. रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली असल्याने अक्षर पटेलने नेतृत्व सांभाळले आहे. अक्षरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा हा RCB कडून २५०वा सामना ठरला आणि एकाच फ्रँचायझीकडून एवढे सामने खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. पण, आयपीएलमध्ये हा पल्ला ओलांडणारा चौथा खेळाडू ठरला आहे. महेंद्रसिंग धोनी ( २६३), रोहित शर्मा ( २५६) व दिनेश कार्तिक ( २५५) यांनी विराटपेक्षा जास्त सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक १०३९* धावा करण्याचा विराटने नावावर केला. रोहित शर्माला ( १०३४) त्याने मागे टाकले.  

कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ६ ) आज अपयशी ठरला आणि मुकेश कुमारने तिसऱ्या षटकात त्याची विकेट घेतली. विराट चांगली फटकेबाजी करत होता आणि त्याने १३ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह २७ धावांची खेळी केली. त्याने दिल्लीच्या इशांत शर्माच्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचला आणि त्यानंतर इशांतला डिवचले. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कोहलीने षटकार खेचला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर इशांतने RCB च्या फलंदाजाला बाद केले. मग, काय दिल्लीच्या आपल्या मित्राला त्यानेही डिवचले. इशांत व विराट हे दोघही दिल्लीचे आणि चांगले मित्र आहेत.  इशांतने एकदा सांगितले होते की, विराटला मी १७ वर्षांखालील ट्रायल देण्यासाठी गेला होता तेव्हापासून ओळखतो. विराट तेव्हा हेल्मेटशिवाय फक्त टोपी घालून वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा. तेव्हाही त्याला वेगवान चेंडूने फार फरक पडला नाही. तो फक्त कॅप घालूनच वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा. तेव्हापासून आमची मैत्री कायम आहे. त्यानंतर अंडर-१९मध्येही विराट फक्त कॅप घालूनच खेळला होता. आम्ही दोघांनी एकत्र प्रथम श्रेणी पदार्पण केले. भारताचे पदार्पण जवळपास एकाच वेळी झाले. त्यामुळे विराटशी माझी खूप घट्ट मैत्री आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहलीइशांत शर्मारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स