IPL 2024, RCB vs DC Live Marathi : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आज दोनशेपार धावा करण्याची संधी होती. पण, दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात चांगला मारा करून त्यांना रोखले. विल जॅक्स व रजत पाटीदार यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून RCB ला मजबूत स्थितीत ठेवले. या दोघांव्यतिरिक्त इतरांना फार हातभार लावता आला नाही.
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
RCB आणि DC या दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये धडक देण्याची अजूनही संधी आहे. रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली असल्याने अक्षर पटेलने नेतृत्व सांभाळले आहे. अक्षरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराटने दिल्लीविरुद्ध सर्वाधिक १०३९* धावा करण्याचा विक्रम नावावर केला. रोहित शर्माला ( १०३४) त्याने मागे टाकले. कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( ६ ) आज अपयशी ठरला आणि मुकेश कुमारने तिसऱ्या षटकात त्याची विकेट घेतली. विराट चांगली फटकेबाजी करत होता आणि त्याने १३ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह २७ धावांची खेळी केली. इशांत शर्माने त्याची विकेट घेतली. विल जॅक्स व रजत पाटीदार यांचे झेल दिल्लीच्या खेळाडूंनी टाकले आणि हे दोन्ही झेल कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर उडाले होते.
मिळालेल्या संधीचं सोनं करताना जॅक्स व पाटीदार यांनी DC च्या गोलंदाजांना झोडले. पाटीदारने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी ५३ चेंडूंत ८८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रसिख सलामने ही जोडी तोडली आणि पाटीदार ३२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर कुलदीपने RCB चा सेट फलंदाज बाद केला. जॅक्सने २९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४१ धावा केल्या. कुलदीपच्या ४ षटकांत ५२ धावा कुटल्या गेल्या. खलिल अहमदने १८व्या षटकात महिपाल लोम्रोर ( १३) व दिनेश कार्तिक ( ०) यांना माघारी पाठवले. १९व्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला स्वप्निल सिंग भोपळ्यावर रसिख सलामच्या गोलंदाजीवर बाद झाला.
कॅमेरून ग्रीनने २४ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३२ धावा करून RCB ला ९ बाद १८७ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: IPL 2024, RCB vs DC Live Marathi : Will Jacks ( 41), Rajat Patidar ( 52) play brillient knock, but RCB in trouble, DC comeback
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.